esakal | कासा परिसरात नागरिकांचा मूर्ती खरेदीला अल्प प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कासा परिसरात नागरिकांचा मूर्ती खरेदीला अल्प प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कासा : नवरात्रोउत्सव (Navratri) दोन दिवसांवर येऊन ठेपलाय.आदिमाया,आदिशक्ती अंबामातेच्या उपासनेला गुरुवार पासून सुरुवात होत आहे. त्यामुळे देवीच्या मूर्ती कारागिरांनी वनविलेल्या आहेत; मात्र याही वर्षी कोरोनाचे संकट पूर्ण संपले नसल्याने उत्सव साजरा करण्यावर मंडळांवर निर्बंध आहेत.

त्यामुळे मूर्तीविक्रीला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे कारागीर सांगत आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून मूर्तिकार आर्थिक संकटात आहेत. कारण अजूनही मोठी सार्वजनिक उत्सव मंडळे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास तयार नाहीत. त्यामुळे मूर्तीखरेदीला प्रतिसाद मिळत नाहीत.

हेही वाचा: नागपूर : इएसआयसी भत्ता ३० वर्षांपासून ‘जैसे थे’च!

दोन वर्षांपासून मूर्तिकार संकटात आहेत. अनेकांना कोणत्याही कलेची माहिती नसताना आयत्या रंगविलेल्या मूर्ती आणून विकत आहेत. त्याचा परिणाम आम्हाला गणपती व | नवरात्र उत्सवात मूर्ती विकण्यावर होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती खरेदीला अल्प प्रतिसाद मिळतो आहे.

- रूपेश वझे, मूर्तिकार

loading image
go to top