Palghar News: जल जीवन मिशनच्या कामांची होणार झाडाझडती; ही संघटना घेणार पुढाकार

योजनेचा उडलेला बोजवारा चव्हाट्यावर आणणार आहेत. त्यामुळे कंत्राटदार आणि अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत | They are going to bring the blown burden of the scheme to the fore. Due to this, the contractors and the officials have panicked

jaljivan mission thane palghat
jaljivan mission thane palghat sakal

MoKhada News: प्रत्येक घरात पाणी ही केंद्र आणि राज्य सरकारची जल जीवन मिशन योजना, सदोष कामांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या बाबतच्या वारंवार तक्रारी समोर आल्या आहेत. श्रमजीवी संघटनेने त्याची पोलखोल करण्यासाठी दंड थोपटले आहे. योजनेतील अनेक गैरप्रकार पुरव्यानिशी उघड करणार आहे.


jaljivan mission thane palghat
Palghar News: मतदार नोंदणीचा वेग वाढला; मतदारांमध्ये मत दीड लाखाने वाढ

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते गावागावात मीटिंग घेऊन जनजागृती करत आहेत. श्रमजीवीचे संस्थापक तसेच राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष ( मंत्री दर्जा) विवेक पंडित हे स्वतः 2 एप्रिल पासून ठाणे पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात दोन दोन सभा घेऊन जनजागृती करत, योजनेचा उडलेला बोजवारा चव्हाट्यावर आणणार आहेत. त्यामुळे कंत्राटदार आणि अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत.(thane palghar news)

प्रत्येक गावात शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल देण्याचा कार्यक्रम सुरु आहे. 4 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयानुसार तालुक्यातील प्रत्येक गावातील राहणाऱ्या सर्व कुटुंबातील घरात, बंगल्यात, घरकुलात, झोपडीत, झापात शाश्वत पाणी साठ्यावरून नळ पाणी पुरवठा योजनेद्वारे पीण्याचे शुध्द पाणी देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे.


jaljivan mission thane palghat
Palghar News: आदिवासी नागरी संस्कृतीचे प्रतिक " बोहाडा ".

तसेच 15 व्या वित्त आयोग व पेसा मधून ही पाणी पुरवठ्यासाठी खर्च होणार आहे. सदर योजनेसाठी निधीची कमतरता कुठेही नाही. 31 मार्च 2024 ला योजना पूर्ण करण्याची मुदत संपली असून अजूनहि अनेक गावांमध्ये सर्व घरांना, झोपड्यांना गावात नळाने पाणी पुरवठा झालेला नाही. विशेष म्हणजे एकदा एखाद्या गावात ही योजना राबवली गेली की पुढचे 30 वर्ष त्या गावात पुन्हा पाण्यावर शासकीय खर्च करता येणार नाही. मात्र, योजनांच्या कामांच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यामुळे योजनांचे काम प्रभावी होण्यासाठी व प्रत्येकाला मुबलक पाणी मिळाले पाहिजे असा श्रमजीवी संघटनेने निर्धार केला आहे. (thane news)

या योजनेत ग्रामसेवक व पाणी पुरवठा, आरोग्य व स्वच्छता समिती यांनी प्रत्येक घरात, झोपडीत, झापात नळाद्वारे पाणी देण्याची व्यवस्था करायची आहे. जल जीवन मिशन योजनेतील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कामे अजूनही अर्धवट आहेत. त्यामुळेच गावातील प्रत्येकाच्या घरापर्यंत नळ पोहचलेला नाही. ऐण टंचाई काळात नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे व निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचे संघटनेने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. तसेच काही गावांमध्ये पहिल्या टप्प्याचे काम न होता दुसऱ्या टप्प्याचे काम करून आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तारखेला ( 31 मार्च पर्यंत ) ठेकेदारांना बिल अदा केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणूनच संघटनेने गेले तीन दिवस प्रत्येक पाणी पुरवठा कार्यालयात प्रशिक्षित कार्यकर्त्यांचा पहारा ठेवला असून अशी बोगस देयक काढण्यापासून ठेकेदारांना रोखण्यात यश आल्याचा दावा श्रमजीवी संघटनेने केला आहे.(palghar water news)


jaljivan mission thane palghat
Palghar Lok Sabha 2024: पालघरमध्ये तिरंगी लढत शक्य! शिंदे गटापुढे पक्षांतर्गत मतभेदांचे आव्हान

गाव – पाड्यातील प्रत्येक घराला, झोपडीला, झापाला नळाद्वारे पाणी पुरवठा मिळावा व झालेल्या कामाची सखोल चौकशी व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यात 1 ते 7 एप्रिल पर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतीवर “हंडा मोर्चे काढण्याचे आंदोलन, श्रमजीवी संघटनेने जाहीर केले आहे. हंडा मोर्चे आणि विवेक पंडित यांच्या दौऱ्यामुळे ठाणे पालघर जिल्ह्यातील कंत्राटदार आणि अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत.(water news)

स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आणि नागरीकांच्या संविधानीक अधिकाराची अंमलबजावणी पहिल्यांदा जलजीवन मिशन योजनेद्वारे पीण्याचे शुध्द पाणी देऊन होत आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, या योजनेची कामे सदोष केली जात आहे. त्यामुळे या कामांची झाडाझडती करण्यासाठी तसेच नागरीकांमध्ये जलजीवन विषयी लोकचळवळ ऊभी करण्यासाठी मी पालघर आणि ठाणे जिल्ह्याचे दौरे करत आहे. प्रत्येक तालुक्यात त्यासाठी दोन बैठका घेणार आहे.

* विवेक पंडित, संस्थापक, अध्यक्ष,

श्रमजीवी संघटना,

अध्यक्ष आदिवासी क्षेत्र आढावा समिती


jaljivan mission thane palghat
Palghar Crime: सराईत सोनसाखळी चोरांना पोलिसांनी केली अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com