

Shrikant Shinde
ESakal
अंबरनाथ : “शिवसेनेला वेगळं शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही. कारण अंबरनाथ शहरात प्रत्येक वॉर्डात हजारो कार्यकर्त्यांची भक्कम फौज आजही शिवसेनेसोबत ठाम उभी आहे. नगरपालिकेवर अनेक वर्षांपासून भगवा फडकत आला आहे आणि आजही नगराध्यक्षपद आमच्याकडे आहे,” असे ठाम विधान खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये केले. माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच रंगले असतानाच शिंदे यांची ही प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जाते.