

Shrikant shinde
ESakal
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेने शिंदे गटाची मोठी राजकीय कोंडी केली आहे. या प्रकरणात शिंदे गटाच्या नगरसेवकाचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः पुढे येत दोषींना कोणतेही राजकीय संरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.