
Siddhivinayak Temple
ESakal
मुंबई : भारतात आज म्हणजेच रविवार (ता. ७) सप्टेंबर रोजी वर्षातील दुसरे आणि सर्वात मोठं चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण रात्री ९:५८ वाजता सुरू होणार असून ग्रहण रात्री ११:४२ वाजता त्याच्या शिखरावर पोहोचणार आहे. यावेळी चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत असून तो लालसर रंगाचा दिसून येणार आहे. त्याला ब्लड मून असे म्हटले जात आहे. दरम्यान चंद्रग्रहणाचा सूतक काळ भारतात लागू असल्यामुळे या दिवशी अनेक मंदिरांची कपाटं बंद ठेवण्यात आली आहेत.