esakal | मच्छीमारांना दिलासा! मासेमारी परवाना नुतनीकरणास 'इतक्या' महिन्यांची मुदतवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

fishing

क्यार व महा चक्रीवादळ व कोरोना प्रादूर्भाव यांमुळे आर्थिक अडचणींमध्ये सापडलेल्या मत्स्य व्यवसायिकांना दिलासा मिळावा, यासाठी मत्स्यविभागाच्या वतीने महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

मच्छीमारांना दिलासा! मासेमारी परवाना नुतनीकरणास 'इतक्या' महिन्यांची मुदतवाढ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मालाड : राज्यातील सागरी मासेमारी क्षेत्रातील यांत्रिकी व बिगर यांत्रिकी नौकांचा मासेमारी परवाना टाळेबंदीच्या काळात संपला असल्यास नुतनीकरणासाठी 1 एप्रिलपासून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

हे ही वाचा : मुख्यमंत्र्याच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक

क्यार व महा चक्रीवादळ व कोरोना प्रादूर्भाव यांमुळे आर्थिक अडचणींमध्ये सापडलेल्या मत्स्य व्यवसायिकांना दिलासा मिळावा, यासाठी मत्स्यविभागाच्या वतीने महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली. 30 जुन 2017 व 3 जुलै 2019 या दोन शासन निर्णयांनुसार मासेमारीसाठी ठेक्याने दिलेल्या तलावांची चालू वर्षाची तलाव ठेका रक्कम व इष्टतम मत्स्य बोटुकली संचयनाची 10 टक्के आगाऊ रक्कम भरण्यासाठी तसेच भाडेपट्टीने देण्यात आलेल्या मत्स्यबीज केंद्राची लॉकडाऊन कालावधीत येणारी चालू वर्षाची भाडेपट्टीची रक्कम भरणे या दोन्हींसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याचे शेख यांनी सांगितले.

मोठी बातमीः सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्ट सांगतो की....

पिंजरा पध्दतीने मत्स्य संवर्धनासाठी देण्यात आलेल्या ठेक्याची रक्कम या कालावधीत आल्यास ती भरण्यास आणि निमखारे पाणी मत्स्यसंवर्धन/ कोळंबी संवर्धन प्रकल्पाच्या परवान्याच्या नुतनीकरणास देखील सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे, असे शेख म्हणाले.

नक्की वाचा : एका कोरोनाबाधित डॉक्टरामुळे अख्खं गाव हदरलं!, 300 हून अधिक रुग्ण संपर्कात

कोळंबी संवर्धन प्रकल्पाचे वीज देयक भरण्यास मुदतवाढ
कोळंबी संवर्धन प्रकल्पांचे वीज देयक भरण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र दिले आहे, असेही शेख यांनी सांगितले.

six months extension for fishing license renewal, read detail story