esakal | खोपोलीमध्ये बस उलटल्याने चालकासह सहा प्रवासी जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

खोपोलीमध्ये बस उलटल्याने चालकासह सहा प्रवासी जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खोपोली : मुंबई-पुणे (Mumbai-Pune) द्रुतगती मार्गावर अतिरिक्त मार्गिकेच्या कामाचा अंदाज खासगी प्रवासी चालकाला न आल्याने बस पलटी झाली. हा अपघात खालापूर क्षेत्रात खोपोली बाह्य मार्गावर घडला. अपघातात चालकासह सहा प्रवासी जखमी झाले.

एसआरएस कंपनीची बस बुधवारी रात्री मुंबईहून पुण्याकडे निघाली होती. बसमध्ये २० प्रवासी होते. साडेअकराच्या सुमारास खालापूर क्षेत्रात खोपोली बाह्य मार्गानजीक अतिरिक्त मार्गिकेचे काम सुरू आहे. वेगात बस घेऊन जाणारा चालक यल्लाप्पा यमनाप्पा वाळद (रा. कोडलीवाड-बेळगाव) याला लेनच्या कामाचा अंदाज न आल्याने बस पलटी झाली.

हेही वाचा: याला म्हणतात यश! घरोघरी दूध वाटणारा मुलगा बनला CA

अपघातात बसमधील संदीप हनुमंत पोटे (वय ५०), प्रभा हनुमंत पोटे (७०), संगीता दयानंद पाटील (४८ तिघे, रा. मिरा रोड, ठाणे), सुरेखा सुधीनाथ शंकर गौडा (६२), मधू सुधीनाथ शंकर गौडा (३२. दोघी रा. ऐरोली), गीता लक्ष्मण गवळी (धारवाड-कर्नाटक) जखमी झाले.

loading image
go to top