
Cooper Hospital
ESakal
मुंबई : विलेपार्ले येथील महापालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांदरम्यान तब्बल सहा रुग्णांना उंदरांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांच्या अर्जाद्वारे मागवण्यात आलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.