Local Train
sakal
मुंबई - महिला डब्यात साप असल्याच्या अफवेने डोंबिवली-सीएसएमटी धीमी लोकलला शुक्रवारी सकाळी चार वेळा थांबावे लागले. ठाण्यात सापाच्या भीतीने प्रवाशांनी चेन पुलिंग केल्याने लोकल १२ मिनिटे थांबली. त्यानंतर मुलुंड आणि नाहूर येथेही लोकल थांबली. अखेर कुर्ल्यात खबरदारी म्हणून महिला डब्यातील प्रवाशांना उतरवून सर्पमित्रांकडून तपासणी करण्यात आली. मात्र, साप आढळला नाही.