झोपडपट्ट्यांमध्ये सोशल डिस्टनसिंगची ऐशी तैशी...

झोपडपट्ट्यांमध्ये सोशल डिस्टनसिंगची ऐशी तैशी...

मुंबई : जगभरावर कोरोनाची भीती पसरलीये. कोरोनाच्या धोक्याने जगभरातील नागरिक धास्तावलेत. दिवसेंदिवस कोरोनाचे नवनवीन रुग्ण समोर येतायत, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची जगभरातील संख्या झपाट्याने वाढतेय. अशात भारत देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रातही मुंबईत सार्वधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेत. अशात मुंबईत असे काही परिसर आहेत जिथं नागरिक अत्यंत दाटीवाटीने राहतायत. मुंबईतील धारावीसारखा परिसर याचंच एक उदाहरण. 

अशात मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये शौचालयाच्या एकाच सीटचा वापर किमान 200 लोक करीत असल्याची बाब आता लक्षात येतेय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे कोरोना पसरण्याची आता भीती व्यक्त होत आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी दाटीवाटीने झोपड्या आहेत. सुमारे 53 लाख लोक झोपड्यांमध्ये राहतात; मात्र त्यामानाने या सर्व भागांमध्ये शौचालयांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे शौचालयांवर मोठा ताण पडत आहे. एका शौचकुपाचा वापर 30 लोकांनी करावा, असा जागतिक आरोग्य संघटनेचा मानक आहे; मात्र मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये एक शौचकूप 200 लोक वापरत असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

दररोज सकाळी शौचालयांसमोर मोठी गर्दी होते. अशा भागांमध्ये कोणतेही सोशल डिस्टनसिंग नसते. हे धोकादायक असले तरी नागरिकांचा नाईलाज आहे. त्यांना दुसरा पर्याय नाही. पर्याय नसल्याने आम्ही जायचं कुठं असा असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करतायत. 

social distancing is not possible in highly populated areas of mumbi slums

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com