Mumbai News : रस्ता खचला, खड्डा पडल्याची तक्रार करा सो‌शल मिडियावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

social media for Road collapsed complain WhatsApp Twitter options available mumbai

Mumbai News : रस्ता खचला, खड्डा पडल्याची तक्रार करा सो‌शल मिडियावर

मुंबई : आपल्या भागातील रस्ता खचला, खड्डा पडला, रस्त्यावर कचऱ्याचा ढीग जमा झाला अगदी आरोग्य संबंधी काही तक्रार असल्यास थेट पालिकेच्या ८९९९-२२-८९९९ या नंबर वर तक्रार करता येणार आहे.

या नंबरवर तक्रार करण्यासाठी इंटिलिजट व्हच्युअल असिस्टंट या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तक्रार केल्यानंतर पाठपुरावा करण्याची गरज भासणार नाही, त्याचे अपडेट मिळेल. आणखी कोणाला संपर्क करायचा याची इत्यंभूत माहितीही आपल्या मोबाईलवर मिळणार आहे.

मुंबई महापालिकेने मुंबईकरांसाठी पालिकेचे कार्यालय, रुग्णालय, दवाखाने, रुग्णालये, कोविड केअर सेंटर, मनपा शाळा, उद्याने, पर्यटन स्थळे, अग्निशमन केंद्रे आदी ८० हुन अधिक सुविधांची माहिती ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर व्हॉट्सअप चॅट-बॉट’द्वारे उपलब्ध केली आहे.

महानगरपालिकेच्या व्हॉट्असअप चॅट-बॉटमुळे तब्बल ८० पेक्षा अधिक सुविधा नागरिकांना सहजपणे उपलब्ध झाल्या आहेत. व्हॉट्असअप चॅट-बॉटवर आतापर्यंत १ लाख ९७ हजार २९९ मुंबईकरांनी संपर्क साधला. तसेच व्हॉट्असअप चॅट-बॉटमुळे नागरिकांना घरबसल्या गणेशोत्सव मंडप परवानग्या, आपल्या विभागाची माहिती, संबंधित संपर्क क्रमांक यासारखी विभागस्तरीय माहिती सहजपणे उपलब्ध होत आहे.

चॕट बॉट अपग्रेडेशन

आता तक्रार करण्यापासून तक्रारदारास पुढील अपडेट वेळोवेळी मिळावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत व्हॉट्सअॅप चॅट-बॉट’ आणखी अद्यावत करण्यात येत आहे. इटिलिजिट व्हर्च्युअल असिस्टंट या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

जगभरात नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला जात असून वेगाने पुढे जात असलेल्या तंत्रज्ञानाचा जनतेला अधिकाधिक उपयोग कसा करून देता येईल, यासाठी मुंबई महापालिकेकडून सतत प्रयत्न सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.