हाथरस बलात्कार प्रकरणी सामाजिक संघटना एकवटल्या; नवी मुंबईत 26 संघटनांतर्फे श्रद्धांजली

सुजित गायकवाड
Tuesday, 6 October 2020

हाथरस बलात्कार प्रकरणी नवी मुंबई आणि पनवेल भागातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन पिडीतेला श्रद्धांजली वाहिली.

नवी मुंबई : हाथरस बलात्कार प्रकरणी नवी मुंबई आणि पनवेल भागातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन पिडीतेला श्रद्धांजली वाहिली. तसेच तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करीत तिव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. या प्रसंगी बेलापूर रेल्वे स्थानकाजवळ 26 सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शांततेत निषेध केला.

'बाळंतपणाआधीच बारसे करू नका, तिघाडी सर्कशीतील जोकर होऊ नका'; अनिल देशमुख यांना भाजपकडून शालजोडीतले

उत्तर प्रदेशमधील हाथरस बलात्कार प्रकरणात एका दलित गरीब कुटुंबातील मूलीला जीव गमवावा लागला आहे. जाती व्यवस्थेने आणखिन एक बळी घेतला आहे. समाजात दिवसेंदिवस स्त्रीयांवर वाढत चाललेल्या अन्याय-अत्याचाराच्या घटना थांबायला हव्यात. याकरीता नवी मुंबई-पनवेलमधील तब्बल 26 संघटना एकत्रित आल्या. बेलापूर रेल्वे स्थानकाच्या पश्‍चिम बाजूस स्त्री-मूक्ती संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अन्वय प्रतिष्ठान, महाराष्ट्र महिला परिषद, परिसर सखी विकास मंच, अन्नपूर्णा परिवार, समता महिला मंडळ, पेण येथील महिला अत्याचार विरोधी मंच अशा पनवेल आणि नवी मुंबई भागातील संघटना एकत्रित आल्या होत्या.

कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्रमाण 1 टक्के; तर लक्षण असलेल्या रुग्णांंचीही संख्या कमी

या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे पिडीतेला श्रद्धांजली वाहिण्यात आली. तसेच या प्रसंगी हाथरस प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा, प्रकरण जलदगती न्यायालयात सुनावणी, घाईगडबडीत प्रेत जाळणाऱ्या पोलिसांची न्यायालयीन चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social organizationson Hathras rape case Tribute by 26 organizations in Navi Mumbai