

Election officials verifying voter lists after software error created duplicate entries in Maharashtra.
Sakal
-दीपा कदम
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे असलेल्या ‘सॉफ्टवेअर’च्या माध्यमातून दुबार मतदारांची यादी तयार केली आहे. यादीसाठी सॉफ्टवेअरचा वापर झाला असल्याने प्रत्यक्ष पाहणी करूनच दुबार मतदारांच्या नावांची यादी निश्चित होणार आहे. त्यासाठी सर्व प्रभागांमध्ये दुबार मतदारांची यादी प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.