सॉईल नेलिंग टेक्निक आणि जीआय वेल्ड मेश ठेवणार मलबार हिल परिसर सुरक्षित

सॉईल नेलिंग टेक्निक आणि जीआय वेल्ड मेश ठेवणार मलबार हिल परिसर सुरक्षित

मुंबई : मलबार हिल टेकडीचा खचलेला भाग पुर्ववत करण्यासाठी महानगर पालिका ही कोकण रेल्वेने दरड कोसळू नये म्हणून वापरते ते तंत्रज्ञान वापरणार आहे. मलबार हिलची टेकडी सुरक्षित करण्याबरोबरच एन.एस पाटणकर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने निवीदा मागवल्या आहेत.

मलबार हिल टेकडी सुरक्षित करण्यासाठी महापालिका "सॉईल नेलिंग टेक्निक आणि जीआय वेल्ड मेश" या तंत्राचा वापर करणार आहे. यात, जस्ताचा थर असलेल्या सळ्या टेकडीच्या उतारावर रुतविण्यात येणार आहे. त्यावर विशिष्ट प्रकारची धातूची जाळी बसवण्यात येणार आहे. जेणेकरुन दरड कोसळण्याचा धोका कमी होईल. हे तंत्रज्ञान कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळणाचा धोका असलेल्या टेकड्यांसाठी वापरण्यात आले आहे. तसेच राज्यातील रस्त्यांच्या परिसरात दरड कोसळण्याची भिती असलेल्या टेकड्यांवर वापरण्यात आले आहे. मलबार हिलच्या जून्या संरक्षक भितीच्या जागी नवी भिंत वापरण्यात येणार आहे. या सर्वासाठी 47 कोटी 29 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी निवीदा मागविण्यात आल्या असून कंत्राटदार निश्चित झाल्यांनंतर 6 महिन्यात हे काम पुर्ण होणार आहे.

याबरोबरच रस्त्याखाली असलेली पर्जन्यवाहीनीही बदलण्यात येणार आहे. याचा फटका 50 झाडांना बसण्याची शक्यता आहे. मात्र, यातील अनेक झाडे दरडीबरोबर पडली आहेत. तर काहींची मुळे कमकुवत झाली आहेत.

काय झाले होते 

6 ऑगस्ट रोजी दक्षिण मुंबईत झालेल्या तुफान पावसात मलबार हिल  डोंगरवाडी  येथील बी.जी.खेर मार्ग खचला होता. या टेकडीची दगडमाती खाली असलेल्या एन.एस.पाटणकर मार्गावर वाहून आली होती. त्यामुळे या रस्त्याचेही नुकसात होऊन काही ठिकाणी भेगाही पडल्या होत्या. 

आतापर्यंत काय झाले 

महापालिकेने टेकडीच्या संरक्षणाचे उपाय सुचविण्यासाठी मुंबई आयआयटीच्या तज्ज्ञांसह खासगी सल्लागाराची नियुक्ती केली होती. त्यांच्या शिफारशीनुसार निवीदा प्रक्रीया राबविण्यात येत आहे.दरड कोसळल्यापासून पाटणकर मार्ग बंद होता. मात्र, 12 सप्टेंबर रोजी पालिकेने दक्षिणेकडे जाणारी एका दिशेची वाहतूक सुरु केली. 

( संपादन - सुमित बागुल )

soil nailing and GI weld mesh technique will keep malbar hill area safe

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com