esakal | "आधी महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्या"; भाजप आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

"आधी महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्या"; भाजप आक्रमक

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची पत्रकार परिषद

"आधी महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्या"; भाजप आक्रमक

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: देशात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. सध्या राज्यात लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण मोहिम अडखळत सुरू आहे, असं राज्य सरकारकडून सांगितलं जातंय. मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी तर 'लस साठा मिळणार असल्याची हमी द्या, तरच १८ ते ४४ वयोगटाला लसीकरण सुरू करू', असं सांगितलंय. राज्यातील बऱ्याच लसीकरण केंद्रांवर लस तुटवडा असल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या मनात भरपूर प्रश्न आहेत. १८ वर्षांपुढील वयोगटासाठी १ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात असलेल्या शंकांचे राज्य सरकारने निरसन करावे, अशी मागणी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केली. मुंबईच्या भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा: असं झालं तर लसीकरण सुरूच करणार नाही- मुंबई महापालिका

"लसीकरणासाठी तरुणांमध्ये उत्साह आहे. 1 मे नंतर लसीकरणासाठी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडतील, अशी अपेक्षा आहे. सध्याचे लसीकरण आणि 1 मे पासून होणारे 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पाहता प्रत्येक महानगरपालिका क्षेत्र व जिल्ह्यानुसार लसीकरण केंद्रांची आकडेवारी जाहीर करावी. 1 मे पासून लसीकरणासाठी होणारी अधिकची गर्दी ध्यानात घेऊन राज्य सरकारने जी लसीकरणासाठी जास्तीची केंद्र निश्चित केली आहेत, त्यांचीही यादी जाहीर करावी", असे उपाध्ये म्हणाले.

हेही वाचा: मुंबईत १८ ते ४४ वयोगटासाठी १ मे पासून लसीकरण नाही?

"1 मे नंतर होणाऱ्या लसीकरणासाठी आयत्या वेळी येणाऱ्या नागरिकांना 'वॉक-इन'ची परवानगी असेल का? की केवळ आधी ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच लसीकरण केले जाईल, याचा राज्य सरकारने खुलासा करणे आवश्यक आहे. लसीकरण मोफत आहे की सशुल्क आहे, याबाबत आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे काही मंत्र्यांच्या वक्तव्यावरून दिसते असल्याने लसीकरण मोफत आहे की नाही याचाही खुलासा राज्य सरकारने करावा", असं केशव उपाध्ये म्हणाले.

loading image