Vidhan Sabha 2019 : तावडेंना डावलून 'यांना' मिळणार तिकीट?

Someone else from BJP might get ticket instead of Vinod Tawde from Borivali in Maharashtra Vindhan Sabha elections
Someone else from BJP might get ticket instead of Vinod Tawde from Borivali in Maharashtra Vindhan Sabha elections

भाजप मुंबई : भाजपच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या यादीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे तसेच प्रकाश शाह यांना अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही. यात तावडेंनी मंत्रीपद भूषविलेले असूनही त्यांना यादीतून वगळण्यात आले असल्याचे समजते. त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील प्रयत्न करत असले तरी पुढील यादीत त्यांचे नाव असण्याची शक्यता धुसर आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने या सर्व गोष्टी कधी स्पष्ट होणार याकडे नेत्यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

तावडे यांच्यावर दिल्लीत गेल्या काही वर्षांपासून नाराज होती, अशी चर्चा सुरु आहे. गेल्या निवडणुकीत तत्कालीन अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या गाडीत बसण्याचा त्यांचा आग्रह चित्रफितीतून बाहेर आला होता. मात्र, त्यांनी सरकार नसतानाच्या काळात केलेले काम बघता त्यांना संधी मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी संयुक्त प्रयत्न सुरू ठेवले आहेत. दिल्लीने हा आग्रह मान्य केला नाही तर विनोद शेलार किंवा प्रविण दरेकर यांना उमेदवारी मिळेल असे सांगितले जाते. 

एकनाथ खडसे यांनी थांबावे असा सल्ला देत त्यांची कन्या रोहिणीला भाजपने उमेदवारी देण्याची तयारी दाखवली आहे. विनोद तावडे यांनी आजवर पक्षासाठी केलेले काम लक्षात घेत त्यांच्याविषयी जीवदानाचे धोरण अवलंबवले जाण्याची शक्यता आहे. बावनकुळे यांना उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्नशील आहेत. प्रकाश मेहता यांच्याऐवजी पराग शहा किंवा प्रवीण छेडा यांचा विचार सुरू आहे. राज पुरोहितऐवजी मकरंद किंवा राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com