कोरोनाच्या संकटात गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी? वाचा सविस्तर

pregnant wpmen
pregnant wpmen

मुंबई ः कोरोना व्हायरसमुळे सर्वच जण आपली काळजी घेत आहेत. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने गर्भवती महिलांनीही काळजी घेणे अत्यावश्यक आहे. वारंवार हात धुणे, खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर रुमाल किंवा टिशू पेपर धरणे, सर्दी-खोकला झालेल्या व्यक्तीजवळ न थांबणे, या प्रकारची काळजी गर्भवती महिलांनी घ्यायला हवी. मात्र, आपात्कालीन परिस्थिती असेल तर कोणत्याही परिस्थितीत
महिलेला रुग्णालयात घेऊन जाणे बंधनकारक असून डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करणे गरजेचे असल्याचे जसलोक रुग्णालयाच्या सल्लागार स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पा अग्रवाल यांनी सांगितले. 

गरजेचे नसल्यास गर्भवती महिलांनी घराबाहेर पडूच नये. ज्या गोष्टी टाळता येतील, त्या टाळल्याच पाहिजे, असा सल्लाही डॉ. अग्रवाल यांनी दिला. रुटीन चेकअपसाठी जाणे ही टाळले पाहिजे. घरच्या घरीच राहून सल्ला घ्यावा.  सरकारने ठरवून दिलेल्या नियमानुसार, 34 आठवड्यानंतर प्रसूतीपर्यंत त्या महिलेची कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे. जर या चाचणी पॉझिटिव्ह आली असेल, तर त्या महिलेची त्या संबंधित रुग्णालयात जाऊन प्रसूती करता येऊ शकते आणि डॉक्टरांनीही त्या महिलेला धीर दिला केला पाहिजे. जर महिला कोव्हिड पॉझिटिव्ह असेल तर त्यानुसार रुग्णालयाचे नियम बदलतात. त्यामुळे, गर्भवती महिलेने ही आधीपासूनच या बाबतची काळजी घेतली पाहिजे, असेही डॉ. अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे. 

कोरोना माता स्तनपान करु शकते  
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, गर्भवती मातेकडून बाळाला कोरोनाचा संसर्ग होत नाही, असे आतापर्यंत आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. जरी माता कोरोना पॉझिटिव्ह असेल तरी बाळाला कोरोना होईलच हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आतापर्यंत 45 ते 46 अशा केसेस आल्या होत्या. त्यातून मिळालेल्या अहवालानुसार, हे सिद्ध होऊ शकते. शिवाय, बाळाची कोरोना चाचणी केली जाते. त्यांच्यावरही लक्ष ठेवले जाते. माता बाळाला स्तनपान करु शकते. मात्र, सर्व प्रकारची काळजी घेतली गेली पाहिजे. 

मानसिक तणावावर कशी कराल मात ? 
गर्भवती मातेला मानसिक तणाव सर्वाधिक असतो. घरात राहूनच योगा, ध्यानधारणा केली पाहिजे. मनाला शांत ठेवले पाहिजे. प्रसूतीसाठी ऐनवेळी घाई करायची नाही. प्रसूतीसाठी रुग्णालयांबाबत पर्याय शोधले पाहिजेत. यासाठी कुटुंबियांनी पुढाकार घेतला पाहिजे. गर्भवती असताना महिलेला वणवण फिरावे लागले आहेत, अशा अनेक बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे, कोरोनाची तपासणी करुनच रुग्णालयात दाखल करुन घेतले जाणार आहे. ती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉ. अग्रवाल सांगतात.
 

गर्भवती मातांनी काय करावे ?

  •  सकस आणि पौष्टिक आहार घ्यावा.    
  •  जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे. 
  •  जेवणाकडे दुर्लक्ष करु नये. फळभाज्या, पालेभाज्या, दूध अशा सर्व पदार्थांचा आहारात समावेश असावा.
  •  घरच्या घरी वजन आणि रक्तदाब तपासायला हवा. या दोन्ही गोष्टी वेळच्या वेळी झाल्याच पाहिजे. 
  •  24 किंवा 28 आठवड्यांवरील गर्भवती असणाऱ्या महिलेने बाळाच्या हालचालींकडे लक्ष दिले पाहिजे. 
  •  12, 20 आणि 34 आठवडे झाल्यानंतरच्या या तिन्ही सोनोग्राफी करुन घेणे गरजेचे आहे.  
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com