Special general meeting Abhay Yojana water Ulhasnagar mumbai
Special general meeting Abhay Yojana water Ulhasnagar mumbaisakal

उल्हासनगरात पाण्यावर अभय योजनेसाठी मंगळवारी विशेष महासभा

भाजपाच्या स्थायी समिती सदस्यांची मागणी मान्य

उल्हासनगर : मालमत्ता कर भरण्यासाठी अभययोजना सुरू झाल्यावर आणि त्यास प्रतिसाद मिळू लागल्यावर भाजपाच्या स्थायी समिती सदस्यांनी थकीत पाणी बिल वसुलीसाठी अभययोजना राबवण्यात यावी या मागणी करिता विशेष महासभेची मागणी केली होती.त्यानुसार उद्या मंगळवारी 29 तारखेला विशेष महासभा होत असून त्यात थकीत पाणी बिल वसुलीसाठी अभययोजनेचा विषय घेण्यात आला आहे.

स्थायी समिती सभापती दीपक(टोनी)सिरवानी,सदस्य जमनादास पुरस्वानी,राजू जग्यासी,कविता पंजाबी,भगवान भालेराव,अर्चना करणकाळे यांनी महापौर लिलाबाई आशान,आयुक्त डॉ.राजा दयानिधी,सचिव प्राजक्ता कुलकर्णी यांना दिलेल्या पत्रात थकीत पाणी बिल वसुलीसाठी अभययोजना लागू करण्यासाठी विशेष महासभेची मागणी केली होती.त्यास मान्यता देण्यात आली असून त्यानुसार हा विषय उद्या मंगळवारी होणाऱ्या महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.

उल्हासनगरातील व्यापाऱ्यांवर,नागरिकांवर 50 कोटी रुपयांच्या घरात पाणी बिलाची थकीत रकम आहे.वेळेवर बिले मिळत नसल्याने अनेक नागरिक व व्यापाऱ्यांची पाण्याची बिले थकीत आहेत.या थकीत रकमेची वसूली करण्यासाठी अभययोजना राबवण्यात यावी.जेणेकरून पालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार यासाठी विशेष महासभा बोलावण्याची मागणी केली होती.त्यानुसार उद्या मंगळवारी विशेष महासभा होणार असून त्यात अभययोजनेचा विषय सर्वानुमते मंजूर होणार असा विश्वास स्थायी समिती सभापती दीपक(टोनी)सिरवानी यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com