कोरोनाच्या भीतीवर मात करण्यासाठी मुंबई युनिव्हर्सिटी आणि टीमने तयार केले विशेष गाणे 

कोरोनाच्या भीतीवर मात करण्यासाठी मुंबई युनिव्हर्सिटी आणि टीमने तयार केले विशेष गाणे 


विरार :कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोक घरात बसून कंटाळले आहेत तर दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी बहुतांश लोकांमध्ये भीतीचे आणि नकारात्मक वातावरण दिसून येत असताना ते घालवण्यासाठी अनेक कलाकार एकत्र येऊन लोकांचे मनोबल वाढवण्यासाठी काही न काही कलाकृती करत आहेत. या कार्यात मुंबई युनिव्हर्सिटी सुद्धा मागे राहिली नसून त्यांच्या  विद्यार्थी विकास विभागाने तयार केलेले गाणे सद्या या गाण्याच्या निमित्ताने वसईचे नावही गाजत आहे ते निलेश सावे या मुंबई युनिव्हर्सिटी विद्यार्थी विकास विभागाच्या  समनव्यकामुळे या गाण्यासाठी सोळा गायकांनी आपला आवाज दिला असून आजचा आघाडीचा गायक आदर्श शिंदे याचा ही यात मोठा सहभाग आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे समनव्यक निलेश सावे यांच्या संकल्पनेतून या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. हे गाणं करताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी विशेष मार्गदर्शन केले. तर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक सुनील पाटील यांनी या गाण्याची निर्मितीसाठी विशेष योगदान दिले आहेत. कोरोनाच्या काळात अनेकांना नैराश्य आणि नकारात्मक विचारांनी ग्रासलेल असताना अनेकांना हा काळ कधी सरतो असे वाटत आहे यावर दृष्टीक्षेप टाकणारा आणि नकारात्मकते कडून सकारात्मक विचारांकडे नेणार हे गाणं आहे. मुंबई युनिव्हर्सिटीसाठी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी गीत लेखन करणारे करणारे झमीर प्रतापगडी यांनी या गाण्याचे लेखन केले आहे. हे गाणं लॉकडाऊनच्या काळात तयार केले असून हे गाणं तयार करण्यासाठी अनेक आजी माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले आहे. फक्त गाण्याच्या ऑडिओने या गाण्याचा प्रभाव मर्यादित राहू शकतो म्हणून या गाण्याची चित्रफीत बनवण्याची धुरा निलेश सावे, निलेश गोपणारायन यांच्या सोबत सुश्रुत म्हसकर यांनी सांभाळली. गाण्याविषयी सर्व गोष्टी या पूर्णपणे फोनवर बोलून ठरवण्यात आल्या या गाण्याच्या निर्मितीची अर्धी प्रोसेस तर फोनवरच झाली आहे. गाण्याच्या चित्रफितीसाठी एनएसएस ने केलेल्या फूड कॅम्प्स चे फोटो वापरण्यात आले असून. त्यांच्याही कार्याची दखल या गाण्यात घेण्यात आली आहे. या  गाण्याला दत्ता मेस्त्री याने संगीतबद्ध केले असून, नीलामाधव मोहपात्रा याने गाणं तयार केले आहे. हे गाणं सोळा  गायकाच्या सुरांनी  सजलेले आहे.  

मुंबई युनिव्हर्सिटी नेशनल सोशल स्कीमचे (एनएसएस) संचालक प्रोफेसर सुधीर पुराणिक यांचे ही या गाण्यात महत्त्वाचे योगदान आहे. मुंबई युनिव्हर्सिटीचे प्र.कुलगुरू रविंद्र कुलकर्णी आणि कुल सचिव अजय देशमुख यांचे ही या गाण्यासाठी मार्गदर्शन मिळाले आहे. मुंबई युनिव्हर्सिटीचा माजी विद्यार्थी तसेच मुंबई युनिव्हर्सिटीचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारा सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे याने सुद्धा या गाण्यासाठी आपला आवाज दिला आहे.

मुंबई युनिव्हर्सिटी नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करत आहे. संपुर्ण देशावर सध्या कोरोनाची एक वेगळी भीती निर्माण झालेली आहे असे असताना सकारात्मक विचार सगळ्यांच्या मनात निर्माण करण्यासाठी या गाण्याची निर्मिती आम्ही केली आहे. कोरोनाचे सावट कधी दूर होईल अपल्यावरून ते सांगता नाही येणार मात्र या नकारात्मक विचारांचे सावट आपण दूर करूच शकतो त्यासाठी आम्ही केलेला हा छोटा प्रयत्न आहे.
निलेश सावे  समनव्यका ,मुंबई युनिव्हर्सिटी विद्यार्थी विकास विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com