१२ सप्टेंबरपासून मुंबईतून सुटणार स्पेशल गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

भाग्यश्री भुवड
Sunday, 6 September 2020

भारतीय रेल्वेने  येत्या १२ सप्टेंबरपासून ८० नव्या स्पेशल ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत  १२ सप्टेंबरपासून मुंबई ते मनमाड दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येईल.

मुंबईः भारतीय रेल्वेने  येत्या १२ सप्टेंबरपासून ८० नव्या स्पेशल ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे.  या रेल्वे गाड्यांच्या तिकिट बुकिंगची सुरुवात १० सप्टेंबरपासून होणार आहे. यावेळी मध्य रेल्वे मुंबई ते मनमाड दरम्यान विशेष रेल्वे सुरू करत आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी आज (5 सप्टेंबर) ही माहिती दिली. 

पुढील सूचना मिळेपर्यंत  १२ सप्टेंबरपासून मुंबई ते मनमाड दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येईल.  ०२१०९ विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून  १२ सप्टेंबरपासून दररोज १८.१५ वाजता सुटेल आणि  मनमाडला त्याच दिवशी २२.५० वाजता पोहोचेल.

०२११० विशेष मनमाड येथून १२ सप्टेंबरपासून पासून दररोज ०६.०२ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईला त्याच दिवशी १०.४५ वाजता पोहोचेल. या रेल्वे दादर, कल्याण, देवळाली, नाशिक रोड, निफाड, लासलगाव या स्टेशनवर थांबा घेतील. 

हेही वाचाः  NCBनं समन्स बजावल्यावर रियानं कोणाला दिली धमकी, वाचा सविस्तर

१७ द्वितीय आसन  श्रेणी + ३ वातानुकूलित चेअर कार अशी या रेल्वेची संरचना असेल. या विशेष रेल्वेगाड्या बुकिंगच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे, असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

सध्या विविध रेल्वे मार्गांवर २३० विशेष एक्स्प्रेस ट्रेन्स चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये ३० राजधानी एक्स्प्रेसचा देखील समावेश आहे.  राज्यांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार रेल्वे गाड्या सुरु केल्या जातील. 

अधिक वाचाः  NCBकडून रिया चक्रवर्तीला समन्स, अटक होण्याची दाट शक्यता

 नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या स्पेशल ट्रेनबाबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेतली जाईल. ट्रेन सुरु करण्याची मागणी होत आहे किंवा मोठी प्रतिक्षा यादी आहे तेथे आधी क्लोन ट्रेन सुरु केली जाईल. त्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादावर नियमितपणे आणखी ट्रेन सुरु केल्या जातील,, असंही भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी सांगितलं.

(संपादनः पूजा विचारे)

Special trains will leave Mumbai from September 12 Check out the schedule


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special trains will leave Mumbai from September 12 Check out the schedule