स्पाईसजेट प्रकरण : कामगारांमध्ये कंपनी विरुद्ध संताप | Spice Jet news update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Spice jet
स्पाईसजेट प्रकरण : कामगारांमध्ये कंपनी विरुद्ध संताप

स्पाईसजेट प्रकरण : कामगारांमध्ये कंपनी विरुद्ध संताप

मुंबई : चुनाभट्टी येथील केंद्रीय औद्योगिक न्यायालयात (central government industrial tribunal) मंगळवारी स्पाईसजेट कंपनी (SpiceJet company) विरुद्ध ऑल इंडिया स्पाईस जेट स्टाफ एम्प्लॉईज असोसिएशनच्या प्रकरणात सुनावणी करण्यात आली दरम्यान, कामगारांना (SpiceJet workers) कामावरून काढू नये या निर्णयाला 7 जानेवारी पर्यंत जैसे थे ठेवण्यात आले आहे. असोसिएशनकडून स्पाईसजेट कंपनीने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे सांगत कंपनीच्या वकिलांनी मात्र अवमान केला नसल्याचे नकार दिला आहे. यामध्ये कामगार आयुक्तांना न्यायालयाने काही माहिती मागितल्याने अखेर सुनावणीसाठी 7 जानेवारी रोजी होणार आहे. (Spice jet workers case hearing in central government industrial tribunal on Friday)

हेही वाचा: कूपर रुग्णालयात परिचारीकांचा अभाव; आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे

कमीत कमी 2 ते जास्तीत जास्त 10 वर्ष झालेल्या कामगारांना पर्मनंट आणि इतर मुख्य मागण्या ऑल इंडिया स्पाईस जेट स्टाफ एम्प्लॉईज असोसिएशनने केल्या आहे. मात्र स्पाईसजेट कंपनीने कामगारांना संघटना निर्माण करण्यासही विरोध केला आहे. या विरोधात असोसिएशन केंद्रीय औद्योगीक न्यायालयात धाव घेतली असून, प्रकरण न्यायालयात असतांना स्पाईसजेट कंपनीकडून कामगारांना कामावरून काढण्यात आले आहे.

त्यामुळेच आता असोसिएशनने पुन्हा केंद्रीय औद्योगिक न्यायालयात कंपनीवर आरोप लावत कामगारांना कमी करून कंत्राटीकरण केले जात असल्याचे सांगितले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर आता शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याचे असोसिएशनचे वकील ऍड.जयप्रकाश जाधव यांनी सांगितले आहे. मंगळवारी चुनभट्टी येथील केंद्रीय औद्योगिक न्यायालयात घेण्यात आलेल्या सुनावणी दरम्यान शेकडो कामगार प्रामुख्याने न्यायालय परिसरात उपस्थित होते.

"न्यायालयावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. कोणत्याही कामगारांवर अन्याय होणार नाही. आता शुक्रवारी याप्रकरणात सुनावणी होणार आहे."

- जयप्रकाश जाधव, असोसिएशनचे वकील.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :workersCentral Government
loading image
go to top