esakal | गुड न्यूज: मुंबईकरांना मिळणार कोरोनावर प्रभावी असणारी स्पुटनिक लस
sakal

बोलून बातमी शोधा

sputnik v covid-19 vaccine

गुड न्यूज : मुंबईकरांना मिळणार कोरोनावर प्रभावी असणारी स्पुटनिक लस

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई :  रशियाने बनवलेली स्पुटनिक (Sputnik vaccine) लस अखेर मुंबईकरांसाठी (Mumbai)उपलब्ध झाली आहे. सामान्य मुंबईकरांना मुंबईतील दोन खासगी रुग्णालयात (Private Hospital) स्पुटनिकचा डोस दिला जाईल. ही लस खासगी केंद्रांमध्ये (Private Center) दिली जाणार असल्याने मुंबईकरांना शासनाने ठरवलेल्या किंमतीनुसार (Price) यासाठी किंमत मोजावी लागणार आहे. स्पुटनिक लसचे लॉन्च यापूर्वीच मुंबईतील एका खासगी रुग्णालयात करण्यात आले होते, परंतु ही लस मर्यादित लोकांना दिली जात होती. स्पुटनिक लस कोरोनाविरुद्ध (Corona) 91 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा परिस्थितीत बर्‍याच मुंबईकरांना ती लस घेण्याची इच्छा आहे. (Sputnik Vaccine Available in two private hospital Mumbai )

सामान्य मुंबईकर स्पुटनिकच्या उपलब्धतेची वाट पाहत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. सोमवारी घाटकोपरच्या जयनोवा शाल्बी रुग्णालयात 105 मुंबईकरांना लसीकरण करण्यात आले. सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत रुग्णालयात लसी दिली जाईल. या लसीची किंमत 1145 रुपये निश्चित केली आहे. त्याचबरोबर दक्षिण मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये मंगळवारपासून स्पुटनिक लस सामान्य मुंबईकरांना दिली जाणार आहे. वोक्हार्ट रुग्णालयाचे प्रमुख डॉ. पराग रिंदानी यांनी सांगितले की, आम्हाला स्पुटनिक लस मिळाली असून आम्ही मंगळवारपासून लसीकरणाचे काम सुरू करू. लाभार्थ्यांकडून सरकारने ठरवलेली किंमतच घेतली जाईल.

हेही वाचा: मुंबई लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे सकारात्मक

1.06 लाखांना मिळाली लस

लस नसल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत ठप्प पडलेल्या लसीकरणाचे काम सोमवारी पुन्हा सुरू झाले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 106904 लोकांना लस देण्यात आली त्यापैकी 62714 लोकांना महापालिकेकडून लस दिली गेली. तर खासगी रुग्णालयांमध्ये 39409 लोकांना लस देण्यात आली तर सरकारी रूग्णालयात 4781 लोकांना लस देण्यात आली. यासह मुंबईत लसीकरणाची एकूण आकडेवारी 61 लाख 15 हजार 929 वर पोहोचली आहे.

राज्यात 3.65 कोटींनी घेतली लस

11 जुलै रोजी राज्यातील 959 केंद्रांवर 1,76,959 लोकांना लस देण्यात आली. यासह राज्यात लसीकरणाची एकूण आकडेवारी 3 कोटी 65 लाख 26 हजार 30 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 2,87,03,564 लोकांनी पहिला डोस घेतला आहे  आणि 78,22,426 लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.

loading image