Mumbai News : मुंबईतील कोणत्याही एसआरए प्रकल्पापेक्षा धारावीकरांना मिळणार जास्त चटईक्षेत्र

धारावीमधील पात्र रहिवाशांना स्वतंत्र स्वयंपाकघर आणि शौचालये असलेले किमान ३५० चौरस फूट आकाराचे घर मिळेल.
dharavi
dharavisakal

मुंबई - धारावीमधील पात्र रहिवाशांना स्वतंत्र स्वयंपाकघर आणि शौचालये असलेले किमान ३५० चौरस फूट आकाराचे घर मिळेल, अशी घोषणा अदाणी समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लि. (डीआरपीपीएल) या विशेष हेतू कंपनीने आज केली.

धारावीतील घरांचे हे क्षेत्रफळ मुंबईतील अन्य झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल १७ टक्के अधिक आहे. सर्व धारावीकरांसाठी या नवीन सदनिका त्यांचे राहणीमान उंचावतील. पात्र निवासी सदनिका म्हणजे एक जानेवारी २००० च्या आधी अस्तित्वात असलेली घरे आहेत. प्रत्येक घरात स्वतंत्र स्वयंपाकघर आणि स्वतंत्र शौचालय असेल. ही घरे सुरक्षित असण्यासोबतच त्यात चांगला उजेड असेल. ती घरे हवेशीर आणि आरोग्यदायी असतील, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

धारावीची चैतन्यमय आणि वेगळी उद्योग-व्यवसाय संस्कृती अबाधित ठेवून धारावीचा व्यावसायिक आणि औद्योगिक परिसर म्हणून विकास करण्याचा व जागतिक स्तरावर जोडलेले शहर बनवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. धारावीकरांचे जीवनमान उंचावणे, आर्थिक संधी, भविष्य घडविणारे शिक्षण तसेच व्यावसायिक प्रशिक्षण, आधुनिक आरोग्य सुविधा आणि दर्जेदार जीवनशैली हे सारे धारावी आणि नवी धारावी येथे उपलब्ध असेल. नागरिकांसाठी सामाजिक सभागृहे, मनोरंजन क्षेत्र, सार्वजनिक उद्याने, दवाखाने आणि मुलांसाठी संगोपन केंद्रेदेखील असतील.

धारावीतील अपात्र निवासी सदनिका धारकांना महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार प्रस्तावित, परवडणाऱ्या भाड्याच्या गृहनिर्माण धोरणांतर्गत निवासस्थान देण्यात येईल. यासाठी, मोठ्या संख्येने झोपड्यांमध्ये असलेल्या रहिवाशांच्या अनेक गरजा लक्षात घेऊन नव धारावीमध्ये, धारावीसारखा विकास करण्यात येईल, असेही प्रवक्त्याने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com