esakal | दहावी-बारावीच्या परीक्षा सुरूच राहणार; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तरतूद 
sakal

बोलून बातमी शोधा

दहावी-बारावीच्या परीक्षा सुरूच राहणार; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तरतूद 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर दिली आहे. या धोरणामध्ये दहावी, बारावी मंडळाच्या परीक्षा सुरू राहतील, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा सुरूच राहणार; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तरतूद 

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मंजूर झाल्यानंतर दहावी बारावी परीक्षा रद्द होणार, असे समज सोशल मीडियावरून प्रसारित होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याच्या परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. परीक्षेची तयारी करण्यात विद्यार्थांचा बहुमूल्य वेळ खर्ची पडत आहे. या पद्धतीला आळा घालण्यासाठी परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल सुचविण्यात आले आहेत. 

औषधी वनस्पतींकडे वाढता कल; अनेकांनी फुलवली घरच्या घरी आयुर्वेदिक बाग...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर दिली आहे. या धोरणामध्ये दहावी, बारावी मंडळाच्या परीक्षा सुरू राहतील, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थांना वर्षातून दोन वेळ परीक्षेची संधी देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थांवर परीक्षेचा सध्या असलेला तणाव कमी होणार आहे. नवीन धोरणानुसार दहावी बारावी बोर्डच्या परीक्षा सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी विद्यार्थांना परीक्षेचे विषय निवडता येणार आहेत. त्याचप्रमाणे बोर्ड परीक्षेचे स्वरूपही बदलण्यात येणार आहे. त्यामुळे निवडलेल्या विषयात विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकेल असे बदल करण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेचा प्रवास आता अधिक वेगवान; खार ते वांद्रे दरम्यान पूर्ण झाले महत्वाचे काम...​

विद्यार्थांना अंतिम परीक्षा वर्षातून दोन वेळा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एक मुख्य परीक्षा आणि काही कारणामुळे परीक्षा देता न येणाऱ्या विद्यार्थांसाठी एक परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा पद्धतीबाबत बोर्ड एक मॉडेल विकसित करू शकणार आहे. त्यानुसार वार्षिक, सेमिस्टर, मॉड्युलर पद्धतीचा अवलंब करता येणार आहे. ही पद्धती निर्माण करताना विद्यार्थांना परीक्षेची भिती वाटेल, अशी परीक्षा पद्धत नसावी, असेही धोरणात म्हटले आहे. काही विषयांसाठी बोर्ड दोन भागात परीक्षा घेऊ शकते. एकामध्ये पर्यायी आणि दुसर्यामध्ये वर्णनात्मक प्रश्न ठेवता येतील, असेही धोरणात म्हंटले आहे.

मुंबई पुण्यातील लॉकडाऊन फसला का ? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत...

तिसरी, पाचवी आणि आठवीची परीक्षा प्राधिकरण घेणार
शालेय शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सर्व विद्यार्थांना नियोजित प्राधिकारणामार्फत आयोजित होणाऱ्या तिसरी, पाचवी आणि आठवी मध्ये परीक्षा द्यावी लागणार आहे. घोकंपट्टी ऐवजी वास्तविक जीवनावर आधारित ही परीक्षा असेल. तिसरीची परीक्षा साक्षरता, संख्या ज्ञान आणि मूलभूत कौशल्यावर आधारित असणार आहे.     
---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image