दहावीच्या निकालात 9.74 टक्क्यांनी वाढ; कोरोनाकाळातही विद्यार्थ्यांची चांगली कामगिरी

तेजस वाघमारे
Wednesday, 23 December 2020

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये घेतलेल्या दहावी व बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल 23 डिसेंबरला जाहीर झाला. दहावीचा निकाल 32.60 टक्के लागला आहे.

मुंबई  : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये घेतलेल्या दहावी व बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल 23 डिसेंबरला जाहीर झाला. दहावीचा निकाल 32.60 टक्के लागला आहे.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल 9.74 टक्क्यांनी वाढला आहे. विद्यार्थांना www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर निकालाची ऑनलाईन प्रत मिळणार आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी व बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2020 च्या परीक्षेचा निकाल जुलै 2020 मध्ये जाहीर झाला. त्यामुळे जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणारी फेरपरीक्षा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घेण्यात आली. दहावीची फेरपरीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान घेण्यात आली होती. दहावी परीक्षेला 44 हजार 88 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 41 हजार 397 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 13 हजार 495 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी 32.60 टक्के इतकी आहे.

मुंबईतील रूग्णालयात ऑक्सिजन पार्क; शुद्ध हवा आणि नैसर्गिक प्राणवायू निर्माण करण्यासाठी प्रयत्न

दहावीच्या फेरपरीक्षेच्या निकालात यंदा वाढ झाली असून, औरंगाबाद विभागाने बाजी मारली आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल 39.11 टक्के लागला. तर सर्वाधिक कमी निकाल नागपूर विभागाचा 29.52 टक्के इतका लागला. नाशिक 37.42 टक्के, कोकण 34.05 टक्के, लातूर 33.59 टक्के, अमरावती 32.53 टक्के, पुणे 30.76 टक्के, कोल्हापूर 30.17, मुंबई 29.88 टक्के इतका निकाल लागला.

ssc results up 9.74 per cent Student performance even during the Corona period

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ssc results up 9.74 per cent Student performance even during the Corona period