Lockdown : 'एसटी' बस सेवेबाबत परिवहन मंत्र्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती, वाचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

शुक्रवारपासून (ता. 22) जिल्हांतर्गत एसटी बससेवा सुरु होणार आहे. काही अटी व शर्तींसह जिल्ह्यांच्या सीमेपर्यंतच ही परवानगी असेल, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

मुंबई : कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार रेड झोन व कंटेनमेंट झोन वगळता इतर विभागांमध्ये शुक्रवारपासून (ता. 22) जिल्हांतर्गत एसटी बससेवा सुरु होणार आहे. काही अटी व शर्तींसह जिल्ह्यांच्या सीमेपर्यंतच ही परवानगी असेल, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

नक्की वाचा : अतिहुशारपणाचा कळस ! सोसायटीत रंगली चक्क 'समोसा' पार्टी, मग पोलिसांनी....

मुंबई व उपनगरांतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी बस सेवा 23 मार्चपासून बंद आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्य सरकारने रेड झोन व कंटेंनमेंट झोन वगळता काही अटींच्या अधीन राहून एसटी महामंडळाला केवळ जिल्हांतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) बस सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यांतील निवडक मार्गांवर शुक्रवारपासून एसटी बस सेवा सुरु होत आहे. 

मोठी बातमी : कोविडचा सामना करण्यासाठी सरकारकडून जम्बो सुविधा केंद्राचा निर्णय...

हे नियम बंधनकारक

  • जिल्हांतर्गत एसटी सेवा सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत. 
  • सर्व बसगाड्यांचे सॅनिटायझरद्वारे निर्जंतुकीकरण.
  • बसमध्ये क्षमतेच्या कमाल 50 टक्के प्रवाशांना मुभा. 
  • जेष्ठ नागरिक, 10 वर्षांखालील मुलांना प्रवासाची परवानगी नाही (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून). 
  • प्रवासी, एसटी कर्मचाऱ्यांनी सॅनिटायझरने हात निर्जंतुक करणे आवश्यक.
  • प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांनी तोंडावर मास्क लावणे अनिवार्य.

ST bus service within the district from today Restrictions remain in the red zone, containment zone


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST bus service within the district from today Restrictions remain in the red zone, containment zone