
वसई : सणासुदीला अनेकजण आपापल्या गावी जात असतात व पारंपरिक पद्धतीने सण साजरे करतात. येत्या काही दिवसांत गणेशोत्सव सुरु होणार आहे. त्यामुळे पालघर मधल्या चाकरमान्यांना गावाकडची ओढ लागली असून पालघर जिल्ह्यातील एसटी सेवेच्या बस गणेशोत्सव काळात १८ ठिकाणी धावणार आहेत. प्रवास करण्यासाठी एसटी बसेसची बुकिंग जोरात सुरु झाली आहे, आतापर्यंत ४२४ बसेस बुक केल्या आहेत.