बेस्टच्या सेवेत असलेल्या ST कर्मचाऱ्यांना दररोज भोजनभत्ता देणार, परिवहन मंत्र्यांची घोषणा

बेस्टच्या सेवेत असलेल्या ST कर्मचाऱ्यांना दररोज भोजनभत्ता देणार, परिवहन मंत्र्यांची घोषणा
Updated on

मुंबई:  बेस्टच्या सेवेत असलेल्या सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार  दररोज 225 रुपये भोजनभत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केली आहे. 

गेली दोन महिने एसटीच्या सुमारे 1 हजार बसेस मुंबईतील बेस्ट वाहतूकीच्या मदतीसाठी धावत आहेत. त्यासाठी  सुमारे 4 हजार 500 पेक्षा अधिक एस.टी. कर्मचारी मुंबईतील बेस्ट वाहतूकीच्या सेवेत आहेत. त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था एसटी महामंडळामार्फत एका खाजगी संस्थेला देण्यात आली होती.  

कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ आणि संबंधित कंपनीकडून जेवण पुरविण्याची वेळ यामध्ये तफावत असल्याने जेवणाबाबतच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याबाबत  अनेक तक्रारी कर्मचाऱ्यांनी ॲड. अनिल परब यांच्याकडे केल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन सदर खाजगी कंपनीचे जेवणाचे कंत्राट तातडीने रद्द करुन सर्व कर्मचाऱ्यांना दररोज रोखीने भोजनभत्ता देण्यात यावा,असे  निर्देश मंत्री परब यांनी दिले होते. त्यानुसार एसटी प्रशासनातर्फे त्वरित कार्यवाही करून सदर भोजन व्यवस्था बंद करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार दररोज 225 रुपये भोजनभत्ता देण्याची व्यवस्था केली आहे.

तसेच मंत्र्यांनी  दिलेल्या निर्देशानुसार, कर्मचारी राहत असलेल्या निवासव्यवस्थेची रोजच्या रोज पाहणी करण्यासाठी मध्यवर्ती आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 7 पथके तयार करण्यात आली असून, त्यांच्याव्दारे कर्मचाऱ्यांना पुरवविण्यात येणाऱ्या निवासव्यवस्थेबाबत अहवाल मध्यवर्ती कार्यालयास सादर करण्यात येणार आहे.

यापुढे, बेस्ट सेवेसाठी राज्यातील विविध भागातून आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना मुंबई राहण्याची आणि जेवणाची कोणतीही गैरसोय होऊ नये, याबाबतची योग्य ती काळजी घेतल्याचे निर्देश मंत्री परब यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.

--------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

ST employees in BEST service will given daily meals Transport Minister announced

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com