बेस्ट बसेससाठी सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे हाल; रस्त्यावर उतरत जोरदार आंदोलन

बेस्ट बसेससाठी सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे हाल; रस्त्यावर उतरत जोरदार आंदोलन
Updated on

मुंबई - मुंबईत बेस्ट सेवेसाठी दाखल झालेल्या 500 एसटी कर्मचाऱ्यांची गोरेगाव येथील रॉयल पाम या हॉटेलमध्ये सोय करण्यात आली होती. हॉटेलमधील अस्वच्छता आणि अन्नपदार्थांमध्ये सापडलेल्या अळ्या, या कारणावरून एसटी वाहक आणि चालकांनी रविवारी रात्री आंदोलन केले.

आरे कॉलनीतील रॉयल पाम हॉटेलमध्ये बेस्ट वाहतूकीसाठी आलेल्या चालक आणि वाहकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. हे हॉटेल याआधी क्वॉरंटाईन सेंटर होते. सध्या या हॉटेलमधील खोल्यांची साफसफाई केली जात नाही. येथे अनेक चालक वाहकांना कोरोनाची लागण झाली होती. एवढे होऊन देखील  त्यांना मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाची दखल एसटी प्रशासनाकडून घेतली जात नव्हती. रविवारी रात्री या कर्मचाऱ्यांनी याविरोधात आंदोलन केले.

कोरोनामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवा बंद झाली होती. परंतु लॉकडाऊन शिथील होत असल्याने बेस्ट सेवाही सुरू झाली होती. परंतु रेल्वे सेवा बंद असल्याने बेस्टवर ताण येत होता. त्यामुळे बेस्ट सेवेसाठी एसटी कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले होते. परंतु एसटी कर्मचाऱ्यांचे मुंबईत हाल होत असल्याचा आरोप अनेक वेळा होत होता. त्यांना योग्य राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था नसल्याचे त्यांनी वारंवार म्हटले होते. त्यामुळे रविवारी या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bandra East encroachment removal violence update
Railway Explains Why Mumbai Local Changed Platform Suddenly
Mumbai Bandra East encroachment drive violence
High Court Dismisses FIR Against Ex-Police Chief in Alleged Political Pressure Casefadnavis
Marathi News Esakal
www.esakal.com