
मुंबई : आता लवकरच शाळेला दिवाळीची सुट्टी लागणार असून मुंबईकरांना आपल्या गावाची ओढ लागणार आहे. त्याच्यात एसटी महामंडळाने तिकीट दर कपात केल्याने दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस.टी.) 'आवडेल तेथे कोठेही प्रवास' या योजनेअंतर्गत चार दिवस तसेच सात दिवस पासचे दर वाढविले होते. मात्र, प्रवाशांची मागणी लक्षात घेता सदर योजनेचे दर कमी करण्यात आले असून, महामंडळाने नवीन दरपत्रक जाहीर केले आहे.