एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य एसटी कामगार संघंटनेनं राज्यसरकारकडे केली 'ही' मोठी मागणी..

bus
bus

मुंबई: राज्यात डॉक्टर, पोलिस आणि इतर आरोग्य कर्मचारी कोरोनायोद्धे बनून लोकांची मदत करत आहेत. तसंच एसटीचे कर्मचारीहे लोकांना आपल्या गावी पोहोचवण्यासाठी किंवा अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्याची सीमा करत आहे. एसटीचे कर्मचारीही या कोरोनाच्या लढाईत अग्रेसर आहेत. त्यामुळे आता एसटी कामगार संघटनेनं राज्य सरकारकडं एक मोठी मागणी केली आहे. 

 कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये कोरोनाची बाधा होऊन मृत्यु झालेल्यांना विमा कवच, सानुग्रह सहाय्य देण्याचा राज्याने निर्णय घेतला आहे. या विमा योजनेचा लाभ एसटी महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा लागु करण्याची मागणी एसटी कामगार संघंटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी केली आहे. 

कोविड विषाणूच्या सार्वत्रिक साथीच्या अनुषंगाने सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध चाचणी, उपचार व मदत कार्य या कार्यवाहीशी संबंधित कर्तव्यावर कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाख रूपयांचा वैयक्तिक अपघात विमा कवच पुरवण्यात येणार आहे. यासंबंधीत राज्य शासनाने जाहीर केलेले नियम आणि अटी एसटी महामंडळास लागू होतात.

हेही वाचा: रिपोर्ट येण्याआधीच डॉक्टरांनी मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात आणि फुटला कोरोना बॉम्ब...
     
त्यामूळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या एसटी कर्मचारी, राज्य शासनाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना प्रवासाची सेवा देत आहे. त्यांना दुर्दैवाने कोविड विषाणूची बाधा होऊन मृत्यू झाल्यास शासन निर्णया प्रमाणे 50 लाख रूपयांचा अपघात विमा कवच लागू करण्याची सुचना जाहीर करण्यात यावे अशी मागणी राज्य एसटी कर्मचारी संघंटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी केली आहे.

ST labors seeks for insurance read full story 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com