ST Bus: एसटी प्रवास महागणार, परिवहन मंत्र्‍यांचे संकेत; पाचच्या पटीत दरवाढ करण्याची एसटी कामगार संघटनेची मागणी

ST Bus Fare Hike: प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रवासी भाडेवाढीचा प्रस्तावाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
ST Bus Fare Hike

ST Bus Fare Hike

ESakal

Updated on

मुंबई : डिझेलच्या वाढत्या दरामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या खर्चात मोठी वाढ झाली असून, एसटी प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दिली. तत्काळ भाडेवाढ केली जाणार नसून, राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com