esakal | मंत्रालयातले कर्मचारीच भाजपला माहिती पुरवतात; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप...
sakal

बोलून बातमी शोधा

jitendra aavhad

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. मात्र महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच सत्र सुरूच आहे.

मंत्रालयातले कर्मचारीच भाजपला माहिती पुरवतात; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. मात्र महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच सत्र सुरूच आहे. त्यात आता मंत्रालयातले कर्मचारीच भाजपला सगळी आतली माहिती पुरवतात असा धक्कादायक गौप्यस्फोट मंत्री जिंतेंद्र आव्हाड यांनी केलाय. 

राज्य सरकार मृतांचा आकडा लपवत आहे असा आरोप काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानुसार राज्य सरकारनं पुन्हा मोजणी करून मृतांचा सुधारित आकडा आज जाहीर केला. मात्र यानंतरही भाजपकडून सतत महाविकास आघाडीवर आणि मुंबई महापालिकेवर सतत आरोप केले जात आहेत.  त्यामुळे विरोधी पक्षाला आतील सर्व गोष्टी मंत्रालयाचे कर्मचारी सांगतात असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

हेही वाचा: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या 'या' मागणीला केराची टोपली; केंद्र सरकारकडून दूरदर्शनची वेळ मिळेना

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड: 

"भाजप काय आमचं बिंग फोडणार? बिंग फोडण्याबाबतची सत्यता काय आहे हे आम्हाला महिती आहे. मंत्रालयातले कर्मचारीच आतून भाजपला सर्व माहिती पुरवतात. मंत्रालयातूनच पेपर पासऑन केले जातात. हे कर्मचारी कोण आहेत हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे". 

हेही वाचा: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्याही लागताहेत रांगा; मग सोशल डिस्टन्सिंग कसं पाळणार??

staff in mantralaya always give information to BJP   

loading image
go to top