देवनार पशुवधगृहातील बकऱ्यांच्या खरेदी-विक्रीला सुरुवात

रशिद इनामदार
Saturday, 3 October 2020

लॉकडाऊननंतर शनिवारी (ता. 3) देवनार पशुवधगृहातील बकऱ्यांच्या खरेदी-विक्रीला सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या सूचनांचे पालन करत या व्यवसायाला सुरुवात झाली. मेंढपाळ, कामगार, व्यापारी, मांसविक्रेत्यांच्या सुमारे दहा हजार कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो. कोट्यवधींची उलाढाल या व्यवसायातून होते. त्यातून पालिकेला मोठ्या प्रमाणात महसूलदेखील मिळतो, अशी माहिती राष्ट्रवादी असंघटित कामगार संघटनेचे पदाधिकारी रावसाहेब दारगुंडे यांनी दिली.

मानखुर्द (बातमीदार) : लॉकडाऊननंतर शनिवारी (ता. 3) देवनार पशुवधगृहातील बकऱ्यांच्या खरेदी-विक्रीला सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या सूचनांचे पालन करत या व्यवसायाला सुरुवात झाली. मेंढपाळ, कामगार, व्यापारी, मांसविक्रेत्यांच्या सुमारे दहा हजार कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो. कोट्यवधींची उलाढाल या व्यवसायातून होते. त्यातून पालिकेला मोठ्या प्रमाणात महसूलदेखील मिळतो, अशी माहिती राष्ट्रवादी असंघटित कामगार संघटनेचे पदाधिकारी रावसाहेब दारगुंडे यांनी दिली.

हेही वाचा : सुशांतची हत्या नव्हे तर आत्महत्याच, एम्सने CBI कडे पाठवला अहवाल

 
लॉकडाऊनमुळे देवनार पशुवधगृहातील शनिवारी व मंगळवारी भरणारा शेळ्या-मेंढ्यांचा बाजारदेखील बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सुमारे पंचेचाळीस हजार जणांवर उपासमारीची वेळ आली होती. हा बाजार पुन्हा सुरू व्हावा, या दृष्टीने विविध संघटना प्रयत्नशील होत्या. 

हेही वाचा : 'एम्स'च्या अहवालावर रियाच्या वकिलांची मोठी प्रतिक्रिया; सत्य उघड होईलच

धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी याबाबत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर ऑगस्ट महिन्यात महापौरांच्या दालनात याविषयी चर्चा झाली होती. त्यानंतर विविध संघटना हा बाजार पुन्हा सुरू व्हावा, यासाठी पाठपुरावा करत होत्या. अखेर शनिवारी सरकारच्या सूचनांचे पालन करत हा बाजार भरण्यास सुरुवात झाली आहे.
-------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start of sale and purchase of goats in Deonar slaughter house