esakal | राज्यातील मालवाहतूक व्यवसाय संकटात, हे आहे कारण,,,
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

कोरोनामुळे चालक घरी जाण्याच्या तयारीत; 80 टक्के चालक युपी, बिहारचे 

राज्यातील मालवाहतूक व्यवसाय संकटात, हे आहे कारण,,,

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : कोरोनामुळे देशात सध्या केवळ 15 टक्केच मालवाहतूक सुरू आहे. तर 30 टक्के मालवाहतूक सध्या चालकांअभावी बंद आहे. या परिस्थितीत राज्यातील मालवाहतूक करणारे सुमारे 80 टक्के चालक आपल्या राज्यात परत जाण्याच्या मार्गावर असल्याने राज्यातील मालवाहतूकीचा व्यवसाय संकटात सापडण्याची दाट शक्‍यता आहे.

घृणास्पद ! कामाच्या दुसऱ्याच दिवशी 34 वर्षीय डॉक्टरकडून 45 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णासोबत...

मुंबई पणवेल, ठाणे, नाशिक, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट (बीपीटी) या भागात मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते. या ठिकाणी सर्वात जास्त चालक परराज्यातील आहेत. कुटुंबाला गावीच सोडून हे चालक मुंबईत रोजगारासाठी येतात, तर मध्ये आळी-पाळीने सुट्या घेऊन ते आपल्या गावी जाऊन कुटुंबाची भेट घेऊन पुन्हा कामावर येत असतात. मात्र, कोरोनाच्या भीतीने अनेक चालकांनी आधीच आपल्या गावी जाण्याचा पर्याय निवडला असून त्यानंतर राहिलेले चालकही आता गावी जाण्याच्या तयारीत आहेत.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यासह देशभरात मालवाहतुकीसाठी दिवसेंदिवस ट्रकची मागणी वाढत आहे. मात्र, चालकांच्या संख्येत घट झाल्याने मालवाहतुकदारांची अडचण झाली आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने राज्यातील संपूर्ण जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाहतुकीची जबाबदारी याच खासगी मालवाहतूकदारांवर आहे. त्यामुळे चालक गावी गेल्यास देशातील मालवाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. अनेक चालकांनी त्यांच्या मालवाहतूक कंपनीकडे सुट्टीचे अर्ज टाकायला सुरूवात केली आहे. सुट्या न दिल्यास काम सोडण्याचीही तयारी या चालकांची असल्याचे नाव न लिहिण्याच्या अटिवर एका चालकाने सांगितले. 

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

चालकांना घरून फोन 
कोरोनाची बाधा होऊ नये, आपली व्यक्ती सुरक्षित आहे की नाही, यासाठी या चालकांना दररोज घरून फोन येतात. चालकांच्या आई, वडील, पत्नी, मुले, भावांकडून घरी येण्यासाठी विनंती केली जात असल्याने चालकांचे कामावर मन लागत नाही. त्यामुळे "सर सलामत तो पगडी पचास' असे म्हणत हे चालक आपल्या गावी परत जात असल्याचे चालक सांगतात. 

पुतण्याचं मुख्यमंत्री काकांना पत्र, कोरोना रुग्णांसाठी राज्य सरकारला सुचवले 'हे' उपाय

चालकांसाठी केंद्राची हेल्पलाईन सुविधा 
केंद्रीय गृह विभागाने राज्यांतर्गत मालवाहतूक करताना चालकांना कोणतीही समस्या आल्यास 1930 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. तर नॅशनल हायवे ऑथॉरिटी मार्गांवर चालकांनी काही अडचण असल्यास, 1033 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. 

म्हणून 'त्या' पाच मुली देणार कोरोनाची अग्निपरीक्षा, जाणून घ्या अधिक...

देशभरातील कोरोना महामारीमुळे मालवाहतूकदार अडचणीत आले आहेत. मालवाहतूकदार आणि चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना राज्य सरकारने केलेल्या नाहीत, अनेक सिमा तपासणी नाक्‍यांवर ट्रकांना रांगा लावाव्या लागत आहे. आधीच कोरोनाची भिती त्यात काम करताना अडवणूक होत आहे, अशा परिस्थितीत चालकांच्या घरून त्यांना फोन येत असल्याने चालक गावी निघाले असल्याने मालवाहतूकदार अडचणीत येणार आहे. 
- बाबा शिंदे,
अध्यक्ष, राज्य माल व प्रवासी वाहतूक

State freight business in crisis