

10% Water Cut Cancel
ESakal
ठाणे : एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्यामुळे ठाणे, मिरा-भाईंदर आणि भिवंडी शहरांसह ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रातही पाणीपुरवठ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, दिवाळीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी २ आणि ९ नोव्हेंबरला नियोजित पाणी बंद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.