
Mira Bhayander Municipal corporation
ESakal
भाईंदर : मिरा-भाईंदर पालिकेने हाती घेण्यात आलेल्या विकासकामांमुळे विस्थापित झालेल्यांना कायमस्वरूपी घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) उपलब्ध असलेली भाडेतत्त्वावर घरे पालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. या निर्णयामुळे सुमारे दोन हजार सरकारी सदनिका पालिकेकडे हस्तांतरित होणार आहेत. ही घरे पालिकेला विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी देता येणार आहेत.