

New Mumbai-Pune Expressway
ESakal
सुजित गायकवाड
नवी मुंबई : राज्य सरकारने नुकतेच अटल सेतूच्या प्रभावाखालील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावांच्या ३२३.४४ चौ. किलोमीटर क्षेत्रात 'थर्ड मुंबई' उभारण्याचे अधिकृत धोरण जाहीर केले आहे. एनएचएआयतर्फे तयार करण्यात येणारा नवा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवे थेट या तिसऱ्या मुंबईच्या मध्यभागातून जाणार असल्याने या भागाला अभूतपूर्व फायदे होणार आहेत. औद्योगिक आणि डेटा सेंटर हब, लॉजिस्टिक पार्कला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.