राज्याचे परिवहन आयुक्त आलेत ऑनफिल्ड; प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर केली कारवाई  

shekhar channe
shekhar channe

मुंबई:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरातील परराज्यातील मजूर मिळेल त्या वाहनाने मुंबई बाहेर पडण्याचे प्रयत्न करत आहेत. अशा वाहनांमध्ये मजुरांची भरगच्च वाहतूक केली जात असल्याने सोशल डिस्टनसिंगचा प्रश्न उपस्थित होत असल्याने परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी स्वतः रस्त्यावर उतरून मालवाहतुकीच्या वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. 

 लॉकडाऊनमध्ये मुंबईसह देशात विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना त्याच्या गावी सोडण्यासासाठी श्रमिक ट्रेन चालविण्यात येत आहे. मात्र त्या सुद्धा अपुऱ्या पडत असल्याने अनेक श्रमिक आपला जीव धोक्यात घालून माल वाहतूक वाहनांमधून प्रवास करताना दिसत आहे. त्यामुळे या  प्रवाशांना रोखण्यासाठी शुक्रवारी परिवहन आयुक्तांनाच रस्त्यावर उतरावे लागले.

मुंबई-आग्रा मार्गावर एका मालवाहतूक वाहनाची तपासणी करून  तब्बल 31 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या वाहनचालकावर कारवाई करत चन्ने यांनी प्रवाशांना वाहनातून खाली उतरविले. गेल्या आठवड्याभरात आरटीओकडून  प्रवासी वाहतूक करणाऱ्या तब्बल 250 माल वाहतूक वाहनांवर कारवाई केली. तसेच अवैध प्रवासी वाहतुकी प्रकरणी 25 वाहने जप्तही करण्यात आली आहेत.  

राज्यातील आरटीओंना आयुक्तांचे आदेश: 

- प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई मध्य यांच्या पथकाने सायन ते वाशी खाडी पूल प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई पूर्व यांच्या पथकाने पूर्व ध्रुतगती महामार्ग व प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई पश्चिम यांच्या पथकाने पश्चिम ध्रुतगती महामार्गावर मालवाहू वाहनातून प्रवासी घेऊन मुंबई बाहेर जाणाऱ्या वाहनांची अहोरात्र तपासणी करावी.

- प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे, यांनी ठाणे, वसई कार्यालयातील अधिकाऱ्यांमार्फत पडघा टोल नाका व अहमदाबाद रोड वर फाउंटन हॉटेलच्या पुढे या दोन ठिकाणी मालवाहू वाहनातून प्रवासी घेऊन मुंबई महानगर क्षेत्राबाहेर जाणाऱ्या वाहनांची अहोरात्र तपासणी करावी.

- प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांनी जत्रा हॉटेल नाशिक येथे मालवाहू वाहनातून प्रवासी घेऊन जाणाऱ्या वाहनांची अहोरात्र तपासणी करावी.

- प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी खारघर टोल नाका येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल, पेण व नवी मुंबई येथील प्रत्येकी एका पथकाच्या साहाय्याने मालवाहू वाहनातून प्रवासी घेऊन मुंबई बाहेर जाणाऱ्या वाहनांची अहोरात्र तपासणी करावी.

- राज्यातील सर्व वायूवेग पथके व सीमा तपासणी नाक्यांवरील अधिकाऱ्यांना मालवाहू वाहनातून प्रवासी घेऊन जाणाऱ्या वाहनांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

- आरटीओ अधिकाऱ्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्या नंतर प्रवाशांना त्यामधून उतरवून एसटीच्या माध्यमाने त्याच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी ची व्यवस्था करण्याचे आदेश सुद्धा राज्य परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्व आरटीओ अधिकाऱ्यांना दिले आहे.

state transport commissioner took actions against migrating traffic vehicle read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com