वाफेवरच्या इंजिनने वेधले लक्ष!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

वाशी येथील सिडको एक्‍झिबिशन सेंटरमध्ये चालणाऱ्या बॉयलर परिषदेबरोबर या ठिकाणी बॉयलर उत्पादकांनी प्रदर्शनही भरविले आहे. त्यामध्ये सर्वात छोटे वाफेवरचे इंजिन बनविण्याचा विश्वविक्रम करणारे नागपूर येथील इक्‍बाल अहमद यांचा स्टॉल या प्रदर्शनात लागला असून तो सर्वांचे विशेष आकर्षण बनला आहे.

वाशी : वाशी येथील सिडको एक्‍झिबिशन सेंटरमध्ये चालणाऱ्या बॉयलर परिषदेबरोबर या ठिकाणी बॉयलर उत्पादकांनी प्रदर्शनही भरविले आहे. त्यामध्ये सर्वात छोटे वाफेवरचे इंजिन बनविण्याचा विश्वविक्रम करणारे नागपूर येथील इक्‍बाल अहमद यांचा स्टॉल या प्रदर्शनात लागला असून तो सर्वांचे विशेष आकर्षण बनला आहे.

 औद्योगिक क्षेत्रात महत्त्वाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉलयरच्या तंत्रज्ञानात प्रगती व्हावी, बॉयलर उत्पादनाला चालना मिळावी, यासाठी नवी मुंबई येथे राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बॉयलर परिषदेचे उद्‌घाटन आज कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाले.

ही बातमी वाचा ः कलम 370 चा अभियांत्रिकी प्रवेशाला फटका 
देशभरातील दीड हजार विद्यार्थीही या परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत. बॉयलर तंत्रज्ञान अस्तित्वात आल्यानंतर बॉयलर इन्स्पेक्शन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. या प्राधिकरणाच्या स्थापनेला यंदा दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही देशातील पहिलीच परिषद आहे. 

देश-विदेशातील तज्ज्ञांचा सहभाग
महाराष्ट्र बॉयलरच्या उत्पादनात देशात अग्रेसर आहे. सुमारे एक हजार २०० बॉयलर राज्यात प्रत्येक वर्षी तयार होतात. बॉयलरच्या तंत्रज्ञानात काही सुधारणा घडवून आणण्यासाठी नवी मुंबईत आजपासून सुरू झालेली परिषद तीन दिवस चालणार आहे. विदेशातील अनेक तज्ज्ञ या परिषदेमध्ये सहभागी झाले असून ते विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Steam engine draws attention!