कोरोना रुग्णांवर 'ही' थेरेपी ठरतेय अत्यंत उपयुक्त सहाय्यक उपचार पद्धती ! घरीही करू शकता...

सुमित बागुल
Monday, 27 July 2020

जगभरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी, कोरोना आजाराला हरवण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न केले जातायत. विविध प्रकारची औषधं शोधली जातायत, लस शोधली जातेय.

मुंबई : जगभरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी, कोरोना आजाराला हरवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जातायत. विविध प्रकारची औषधं शोधली जातायत, लस शोधली जातेय. अशात विविध डॉक्टर्सकडून वेगवेगळ्या थेरीपीवर देखील संशोधन केलं जातंय.

मुंबईतील अंधेरीच्या सेव्हन हिल्स या रुग्णालयातील तज्ज्ञांनी देखील अतिशय महत्त्वाचा अभ्यास केलाय. या अभ्यासाअंती वाफेमुळे नाक आणि घशातील संसर्ग रोखण्यास मदत होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. सेव्हन हिल्स रुग्णालयाचे मानद कन्सल्टंट डॉ. दिलीप पवार, डीन डॉ. बाळकृष्ण अडसूळ, रुग्णालयाच्या डॉ. स्मिता चव्हाण, साहाय्यक प्राध्यापक डॉ. हर्षलकुमार महाजन, डाटा संशोधक सीमांतीनी भल्ला आणि लेझर शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. रुसी भल्ला या टीमने हा अभ्यास केलाय.   

मोठी बातमी - मुख्यमंत्र्यांच्या स्टिअरींच्या विधानांनंतर उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजित पवारांकडून सूचक फोटो ट्विट

संशीधनाची प्रक्रिया काय होती ?

  • अंधेरीच्या सेव्हन हिल्स या रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे पाचशे पेक्षा अधिक हेल्थ वर्कर्स सहभागी झाली होते.   
  • या कोरोनाग्रस्त हेल्थ वर्कर्सना दोन गटांमध्ये विभागण्यात आलं होतं
  • यातील एका गटाला स्टीम थेरेपी देण्यात आली. 
  • म्हणजेच एका गटातील कोरोनाग्रस्तांना पाणी गरम करून पाच मिनिटांकरता तीन ते चार वेळा वाफ देण्यात आली.
  • इंडियन मेडिकल गॅझेटमध्ये  याबाबत एक अभ्यास साधार करण्यात आला 

मोठी बातमी - मुंबईत पुन्हा दमदार पावसाची एन्ट्री, अनेक ठिकाणी पाणीच पाणी

याबाबत माहिती देताना सेव्हन हिल्सचे डीन डॉ. बाळकृष्ण अडसूळ म्हणतात, वाफ घेणं ही कोरोनावरील शास्त्रीय उपचार पद्धती नाही. मात्र कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचार सुरु असताना 'स्टीम थेरेपी' ही अत्यंत उपयुक्त सहाय्य्क उपचार पद्धती आहे. तज्ज्ञांच्या टीमने यावर अत्यंत बारकाईने अभ्यास केलाय आणि वाफेमुळे कोरोनाच नव्हे तर इतर संसर्गजन्य आजारही कमी होऊ शकतात असं निरीक्षणाअंती समोर आलंय.    

स्टीम थेरेपीनंतर ही होती अभ्यासाची निरीक्षणे : 

  • कोरोना आपल्या फुफ्फुसांवर हल्ला चढवतो. मात्र वाफ घेण्याने फुफ्फुसांना होणार धोका कमी झाला
  • ठराविक अंतराने वारंवार वाफ घेणत्याने नाकात आणि घशातील संसर्गाची तीव्रता कमी झाली.   

steam therapy is helpful to reduce covid 19 infection in throat and mouth


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: steam therapy is helpful to reduce covid 19 infection in throat and mouth