खते, बियाणे, किटकनाशके खरेदीची शेतकऱ्यांची गैरसोय थांबणार, प्रशासनाने उचलली पावले

 fertilizer
fertilizer

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चौथ्या टप्प्यातील टाळेबंदी 31 मे पर्यंत जाहीर करण्यात आली आहे. कृषि सेवा केंद्र, खते व कृषि उत्पादनाशी सलग्न उप्रकम प्रतिबंधित क्षेत्रात येत असतील तर, अशा दुकानांना सेवा देण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा कृषी विभागाने प्रतिबंधित क्षेत्रातील दुकानांना तात्पुत्या स्वरुपात त्या क्षेत्राबाहेर दुकान सुरु करण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी दिली. 

दिवसेंदिवस कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात खरीप हंगाम तोंडावर येवून ठेपला आहे. त्यामुळे या हंगामासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांना खते, बियाणे, किटकनाशके या कृषि निविष्ठा पुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेवून, जिल्हयातील सर्व कृषि सेवा केंद्र, खते, बियाणे व किटकनाशके कृषि उत्पादनाशी सलग्न सर्व उपक्रम तसेच शेतमजुर यांना सुट देण्यात आली आहे. 

असे असले तरी, प्रतिबंधित क्षेत्रात खते, बियाणे व किटकनाशके या कृषि निविष्ठांचे गोडावून, औजारे विक्री व सेवा केंद्र, कृषि उत्पादनाशी सलग्न सर्व उपक्रमांना सेवा देण्यास बंदी घालण्यात आल्यामुळे साहित्य मिळणार कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत होता. त्यावर उपाययोजना म्हणून ठाणे जिल्हा कृषी विभागाने प्रतिबंधित क्षेत्रातील कृषी विषयक सेवा केंद्रांना व खते, बियाणे अवजारे विक्री करणाऱ्या दुकानदारांना त्या क्षेत्राच्या बाहेर आपली जागा उपलब्ध असेल तर कृषि निविष्ठांची विक्री व साठा करण्यास तात्पुरती मान्यता देण्यात आली आहे. 

परवान्यासाठी मुदतवाढ
प्रतिबंधात्मक क्षेत्रातील कृषी सेवा केंद्रांना परवान्यात समाविष्ट असलेल्या सर्व अटी व शर्ती या बंधनकारक असणार आहेत. तसेच ज्यांच्या परवान्याची मुदत संपत आली असल्याने नुतनीकरण, उगम प्रमाणपत्र समाविष्ट करण्यासाठी ३० जून अखेरपर्यंत मुदत बाढवून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी दिली.

steps taken by the administration will stop the inconvenience of farmers to buy fertilizers, seeds and pesticides

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com