खर्डीतील बंद असलेल्या एसटीच्या मालकीच्या उपहारगृहात परप्रांतीयांचे बस्थान

अनुचित प्रकार घडण्याची शक्यता;बस थांबा सुरू करण्याची गरज
Mumbai
MumbaiSakal

मूबंई : मूबंई-आग्रा (Mumbai) महामार्गावरील खर्डी (Khardi) नाक्यावर वापर नसणाऱ्या एस.टी. (S.T) महामंडळाच्या उपहारगृहात गेल्या १० दिवसापासून परप्रांतीय १५/२० भटक्या लोकांनी बस्थान बसवले असल्याने उपहारगृहाचा वापर अवैध धंदे करण्यासाठी होत असून त्यांना कोणीही हटकत नसल्याने ते बिनदिक्कत पणे (Pen) त्यात रहात आहेत. तर गर्दुल्ले व दारुडे यांचा कायम वावर असल्याने येथून ये-जा करणाऱ्या लोकांची लूटमार होण्याची शक्यता असून प्रवाश्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

येथील एसटी उपगृहात बस्थान करणाऱ्या १५/२० भटक्या परप्रांतीय लोकांची चौकशी करून त्यांना उपहारगृहातून हलविण्यात यावे व याठिकाणी पुन्हा उपहारगृह-बस थांबा सुरु करण्यात यावा अशी मागणी दोस्ती फौंउडेशनच्या वतीने परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे करण्यात आली आहे. गेल्या ९ वर्षापासून मुंबई-आग्रा महामार्गावरील खर्डी नाक्यावरील बसथांबा व उपहारगृह परिवहन विभागाने बंद केल्याने, बाहेर गावावरून खर्डीत येणाऱ्या-जाणारया बस सद्या येथे थांबत नाहीत त्यामुळे येथील प्रवाश्याना जीव धोक्यात घालून मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागत आहे.आहे.परीवहन अधिकारयांच्या हलगर्जीपणामुळे खडींतील बस थांबा ओस पडला असुन येथुन ३-४ किमी अंतरावरील खाजगी धाब्यावर बस थांबत आहेत.

Mumbai
संगमनेर : बसचालकाची आत्महत्या; एसटी विभागाला झटका

मूबंई-आग्रा महामार्गालगत खडीं नाक्यावर एसटी महामंडळाच्या मालकीची १ हेक्टर ४८ गूंठे जमीन स्टेट ट्रांसपोर्ट एस टी महामंडळच्या नावाने सातबारा आहे. ह्याच जागेतील दुरावस्था झालेल्या उपहारगृहात गेल्या १० दिवसापासून परप्रांतीय आपल्या वहानासहित ३/४ कुटुंब रहात आहेत.दरवाजे -खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहेत तर वर छप्परव चारी बाजूच्या भिंती व्यवस्थित असून दरवाजा नसल्याने ते सताड उघडे असते.त्यामुळे ह्या उपहारगृहात दारुडे, गरदुले व भिकारी यांचे कायम वास्तव्य असून येथे एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.

खर्डी येथील परिवहन विभागाच्या मालकीच्या जागेत बंद असलेल्या उपहारगृहाच्या जागेवर व्यापारी संकुल किवा पेट्रोल पंप सुरु करावा जेणें करून येथील स्थानिक बेरोजगार तरुणाना रोजगार उपलब्ध होऊन बसही थाबतील त्यामुळे स्थानिक प्रवाश्याना प्रवास करणे सूखकर होईल."गणेश राऊत,दोस्ती फौंउडेशन व तालुका उपसंपर्कप्रमुख शिवसेना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com