esakal | कल्याण ग्रामीण भागातही राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार निदर्शने
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कल्याण ग्रामीण भागातही राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार निदर्शने

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ कल्याण ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि काँग्रेस (Congress) च्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. मानपाडा चौकात राष्ट्रवादी (NCP) कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. तर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजपा मंत्र्यांच्या मुलास फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत कल्याण शीळ रस्ता रोको आंदोलन केले.

लखीमपूर झालेल्या हिंसेच्या विरोधात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज राज्यव्यापी बंद पुकारला आहे. कल्याण ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करीत केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराचा निषेध नोंदवला.

मानपाडा चौकात कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष दत्तात्रय वझे, गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, रंगनाथ ठाकूर, भगवान पाटील, विश्वनाथ रसाळ, संतोष संते, नाशिर खान, ब्रम्हा माळी, वैभव माळी, सचिन भोईर, योगेश डांगे, स्वप्नील चौधरी, समीर शेख, संदीप भोईर, अमरेंद्र मेहता, प्रकाश बामणे, दिलीप चव्हाण यांनी एकत्र येत देशातील वाढती महागाई आणि शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याया विरोधात घोषणाबाजी केली.

हेही वाचा: Aundh : औंधरस्ता येथे महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन

तसेच कल्याण शीळ रोडवर गोळवली येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस कल्याण डोंबिवलीचे सुधीर पाटील यांच्यासह तुषार म्हात्रे, सुरय्या पटेल, उज्वला भोसले, कार्यकर्त्यांनी जमून केंद्र सरकारचा निषेध करत कल्याण शीळ रोडवरील वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. मानपाडा पोलिसांनी त्वरित कार्यकर्त्यांना रस्ता मोकळा करण्याची सूचना केली.

उत्तर प्रदेशातील घटना ही निंदनीय आहे. महाराष्ट्र बंद करून आज यूपी मधील सरकारला जागे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भाजपाच्या केंद्रीय गृह मंत्र्यांच्या मुलाला अटक होऊन फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी यावेळी केली.

loading image
go to top