esakal | विद्यार्थी शिक्षणासाठी कोल्हापूर, पाचगणीला रवाना
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

विद्यार्थी शिक्षणासाठी कोल्हापूर, पाचगणीला रवाना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कासा : गेल्या दीड-दोन वर्षांपासून ग्रामीण पालघर (Palghar) जिल्ह्यातील भागातील आदिवासी विद्यार्थी इंग्रजी (english) शिक्षणापासून (education) वंचित राहिले होते.

कोरोनामुळे शिक्षणासाठी येथील विद्यार्थी जाऊ शकले नव्हते. अखेर पुन्हा अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्यामुळे रविवारी डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत इंग्रजी शिक्षणासाठी डहाणू प्रकल्पांतर्गत ४५ विद्यार्थी कोल्हापूर येथील ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल व पाचगणी येथील इंग्रजी शाळेमध्ये रवाना झाले .

हेही वाचा: लसीकरण नसले तरी शाळेत या! शिक्षण आयुक्त सोळंकी यांचे शिक्षकांना आदेश

यामध्ये कासा, रानशेत, गंजाड, थेरोंडा, ओसरवीरा, वाघाडी, बापूगाव, वागर्जे येथील ३ री ते ११ वी च्या ४५ विद्यार्थ्यांचा समावेश होता. या मुलांना घेण्यासाठी कोल्हापूर व पाचगणी येथील ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग यांनी दोन लक्झरी बस आणल्या होत्या.

loading image
go to top