शुल्कमाफीसाठी विद्यार्थ्यांचे मंत्रालयासमोर आंदोलन; सरकारी तिजोरीसाठी आज भीक मागणार 

शुल्कमाफीसाठी विद्यार्थ्यांचे मंत्रालयासमोर आंदोलन; सरकारी तिजोरीसाठी आज भीक मागणार 
Updated on

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांवर आर्थिक संकट कोसळले असताना खासगी व शासकीय महाविद्यालये विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सतत तगादा लावत आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात सवलत मिळावी, अशी मागणी विद्यार्थी संघटना करत आहेत. यानंतरही उच्च व तंत्रशिक्षण विभाग कोणताही निर्णय घेत नसल्याने महाराष्ट्र स्टुडंट्‌स युनियन आणि विद्यार्थी मंत्रालय, शिवालय परिसरात बुधवारी (ता. 11) भीक मागून सरकारची तिजोरी भरणार आहेत. 

राज्यातील विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पालकांवर आर्थिक संकट कोसळले असताना खासगी व शासकीय महाविद्यालये विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावत आहेत. यामुळे महाराष्ट्र स्टुडंट्‌स युनियन गेल्या दोन महिन्यांपासून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची अनेक वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या व्यथा, अडचणी निवेदनाद्वारे त्यांच्याकडे सतत मांडल्या आहेत.

तसेच विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट परतावा आणि प्रवेश शुल्कामध्ये सूट मिळावी, अशी मागणी केली; परंतु आश्‍वासनाशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येत नसल्याने संघटनेने उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 11 नोव्हेंबरला मंत्रालय परिसरात, शिवालय कार्यालय आणि मंत्र्यांच्या बंगल्यासमोर भीक मागून निधी उभारण्यात येणार आहे, असे संघटनेचे अध्यक्ष ऍड. सिद्धार्थ इंगळे यांनी सांगितले. 

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com