कासा : विद्यार्थी लाकडी होडीतून करतात प्रवास; पूल बांधण्याची गावकऱ्यांची मागणी

Students in Boat
Students in Boatsakal media

कासा : डहाणू तालुक्यातील कोसेसरी-भवाडी येथील विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून सूर्या नदीतून (Surya river) प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी कासा येथे यावे लागते. शाळेत जाण्यासाठी या मुलांना अशा लाकडी तराफ्यात किंवा लाकडी नावेत बसून नदी ओलांडून (Students boat traveling) जावे लागते. मागील अनेक वर्षांपासून या नदीवर पूल व्हावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. पालघर जिल्हा परिषद (Palghar jilla Parishad) अध्यक्ष वैदेही वाढण (Vaidehi vadhan) यांनी कोसेसरी, सार्शी येथील नदीकिनारी येऊन पाहणी केली. नदीवर पूल बांधण्यासाठी उपाययोजना केली जाईल असे सांगितले.

Students in Boat
नवी मुंबई : एकतर्फी प्रेमातून मुलीवर चाकूहल्ला; फरार झालेला आरोपी अटकेत

कासा किंवा तलवाडा येथे जाण्यासाठी १८ ते २० किलोमीटर वळसा घालून यावे लागते. त्यात तेथून प्रवाशी वाहनांची कमतरता आहे. त्या प्रवासासाठी भाडे व वेळदेखील जास्त लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी या नदी पात्रातून प्रवास करतात. लाकडी तराफ्यातून प्रवास धोकादायक असल्याचे पालक सांगतात. मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा प्रवास अशाच प्रकारे सुरू असून रोज ७० ते ८० शाळकरी विद्यार्थी असा प्रवास करतात. त्यामुळे हा धोकादायक प्रवास सुखकर व्हावा यासाठी नदीवर पूल बांधण्याची मागणी गावकरी करीत आहेत.

अनेक वर्षांच्या मागणीनंतर आज पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढण यांनी कोसेसरी, सार्शी येथील नदीकिनारी येऊन पाहणी केली. या वेळी पंचायत समिती सभापती स्नेहलता सातवी, डहाणू तालुकाप्रमुख अशोक भोईर, युवा सेना सचिव हेमंत धर्ममेहेर, बांधकाम अधिकारी श्रीकृष्ण काळे, मनीष चकधरे, जिल्हा परिषद सदस्य शैलेश करमोडा, कासा माजी सरपंच रघुनाथ भोईर, राजकुमार गिरी, जितेंद्र पटेल व कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हा परिषद अध्यक्षांचा होडीतून प्रवास

शाळकरी मुलांसोबत अध्यक्ष वैदेही वाढण यांनी स्वतः लाकडी होडीत बसून प्रवास केला. पाहणी करून येथील नदीवर पूल बांधण्यासाठी उपाययोजना केली जाईल असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com