
अखेरच्या वर्षाच्या परिक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याने अनेक विद्यार्थी नाराज आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या प्रत्येक दिवसागणिक वाढत असताना परिक्षेचा आग्रह कशाला अशी विचारणा अनेक विद्यार्थी करीत आहेत.
मुंबई : अखेरच्या वर्षाच्या परिक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याने अनेक विद्यार्थी नाराज आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या प्रत्येक दिवसागणिक वाढत असताना परिक्षेचा आग्रह कशाला अशी विचारणा अनेक विद्यार्थी करीत आहेत.
नक्की वाचा : लॉकडाऊनमुळे नोकरी मिळत नाहीये?..घाबरू नका.. अशी मिळवा नोकरी
अनेक विद्यार्थ्यांनी ट्विटरवरुन आपली नाराजी व्यक्त करताना उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, मुंबई विद्यापीठाबरोबरच आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांना हॅशटॅग केले आहे. आम्ही कुठे फिरायला जाण्यासाठी परिक्षा घेऊ नका असे सांगत नाही. आमचाही सध्याच्या परिस्थितीत विचार करा, असे ट्विट यश शाहने केले आहे. तर कायराने मुंबई विद्यापीठाने पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ताण कमी केला आहे आमचे काय. जी काही सध्याची परिस्थिती आहे, त्यामुळे तणाव आहेच. त्या परिस्थितीत आम्ही प्रवास करावा आणि परिक्षा द्यावी ही अपेक्षा कशी करता, अशी विचारणा केली आहे.
महत्वाची बातमी : मुंबई विद्यापीठाकडून 158 परीक्षांचे नियोजन सुरू, वेळापत्रक लवकरच जाहीर होणार
सर्वांचाच परिक्षेला विरोध नाही. जय सावला याने मुंबई विद्यापीठाने निर्णय घेताना त्याचे विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतील याचा विचारच केला नाही असेच काही विद्यार्थी समजत आहेत. लॉकडाऊन कायम राहिल्यास किंवा कोरोनाची साथ कमी न झाल्यास मुंबई विद्यापीठांच्या परिक्षांचे काय होणार हा प्रश्न आहे. मुंबईतील साथ कमी होत नाही, तोपर्यंत सार्वजनिक वाहतूक सुरु होणार नाही, याकडे लक्ष वेधतात. मुंबई विद्यापीठाची परिक्षा केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रातील विद्यार्थीच देत नाहीत, तर देशातील अनेक विद्यार्थी देतात. हे विद्यार्थी परिक्षेसाठी मुंबईत कसे येणार, मुंबई रेड झोनमध्ये आहे, या परिस्थितीत परिक्षेसाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा धोका वाढणार नाही का अशी विचारणा होत आहे.
Students upset over final year exam decision? complaints on social media