esakal | क्या बात है..! सुधागड तालुका झाला कोरोनामुक्त...
sakal

बोलून बातमी शोधा

sudhagad ccc.

सुधागड तालुक्यात नागशेत आणि गोमाशी येथे कोरोनाचे 2 रुग्ण सापडले होते. मात्र आता हे दोन्ही रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. परिणामी सुधागड तालुक्यात आता एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही.

क्या बात है..! सुधागड तालुका झाला कोरोनामुक्त...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पाली (वार्ताहर) : कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित असलेल्या सुधागड तालुक्यात मे महिन्यात कोरोनाने शिरकाव केला (ता. 24) नागशेत येथील एका 62 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉजीटिव्ह आला होता. त्यानंतर मंगळवारी (ता.2) गोमाशी येथील एका 24 वर्षीय तरुण व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सुधागड तालुक्यात घबराट पसरली होती. मात्र बुधवारी (ता.10) गोमाशी येथील 24 वर्षीय तरुण रुग्ण बरा झाला. आणि शुक्रवारी (ता. 5) नागशेत येथील 62 वर्षीय रुग्ण बरा झाला आहे. या दोघांनाही घरी सोडण्यात आले आहे. सध्या त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

वाचा ः मुंबई महापालिकेकडून 'या' भागातल्या तब्बल 790 इमारती सील

सुधागड तालुक्यात नागशेत आणि गोमाशी येथे कोरोनाचे 2 रुग्ण सापडले होते. मात्र आता हे दोन्ही रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. परिणामी सुधागड तालुक्यात आता एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. त्यामुळे सुधागड तालुक्यातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वाचा ः मान्सूनच्या आगमनाने मुंबईकर सुखावले! शहरात जोरदार वाऱ्यासह पावसाची एन्ट्री

दरम्यान, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुधागड तालुक्यातील वावळोली येथे प्रशासनाच्या वतीने 100 बेडचे सुसज्ज असे कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी नुकतीच या कोव्हिड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. 

वाचा ः रुग्णालयातून पळालेल्या 'त्या' वृद्ध व्यक्तीचा मृत्यू; ट्रेनच्या धडकेत गमावला जीव...
 

महसूल प्रशासन, आरोग्य विभाग आणि लोकप्रतिनिधी कोरोनाच्या लढाईत महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. लोकांचे सहकार्य चांगले आहे. तसेच तालुक्यात खबरदारीचा उपाय म्हणून वावळोली येथे 100 बेडचे कोव्हिड सेंटर देखील उभारले आहे. 
- दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली-सुधागड
 

loading image
go to top