'या' नेत्याचा मनसेला रामराम; लढवली होती विधानसभा निवडणूक

श्रीकांत खाडे
Wednesday, 2 September 2020

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अंबरनाथ विधानसभा निवडणूक लढवणारे अधिकृत उमेदवार सुमेध भवार यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. मागील वर्षी 2019 साली झालेली विधानसभा निवडणूक भवार यांनी मनसेतर्फे लढवली होती.

अंबरनाथ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अंबरनाथ विधानसभा निवडणूक लढवणारे अधिकृत उमेदवार सुमेध भवार यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. मागील वर्षी 2019 साली झालेली विधानसभा निवडणूक भवार यांनी मनसेतर्फे लढवली होती.

ही बातमी वाचली का? चुकीला...माफी नाही! आर्थिक दंडासह दुकान बंद तर नागरिकांवरही एफआयआर दाखल होणार

त्यापूर्वी भवार यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली होती. मात्र अंबरनाथची युतीतील जागा शिवसेनेला सोडण्यात आली. त्यामुळे भवार यांनी मनसेकडून उमेदवारी मिळवली होती. विधानसभा निवडणुकीनंतर कोरोनाच्या काळात गरजूंना विविध प्रकारे मदतकार्य केले आणि अजून चालू आहे.

ही बातमी वाचली का? मुंबईतील जॉगिंग ट्रॅक खुले करावेत; भाजप खासदाराचे केंद्र सरकारला पत्र

मात्र  विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या कामकाजात डावलले गेल्याचा तसेच विश्वासात घेतले गेले नसल्याचा आरोप भवार यांनी पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात केला आहे. या कारणामुळे पक्ष सोडत असून पक्षात कोणतेही पद नको , चांगली व्यक्ती आणि चांगले दिवस याची किमत वेळ निघून गेल्यावर समजते असेही श्री.भवार यांनी  राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
--------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sumedh Bhawar's farewell to MNS; Assembly elections were contested from Ambernath